Ms Dhoni And Sunil Gavaskar
Ms Dhoni And Sunil Gavaskar saam tv
क्रीडा | IPL

Ms Dhoni Autograph: फॅन मुमेंट! लिटिल मास्टरनं घेतला थालाचा ऑटोग्राफ! पाहा IPL मधील सर्वात भावनिक क्षण -VIDEO

Ankush Dhavre

Sunil Gavaskar And Ms Dhoni Autograph Video: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आपल्या घरच्या मैदानावरील अखेरचा सामना रविवारी चेपॉकच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात चैन्नई सुपर किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मात्र या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या चाहत्यांचे मन जिंकले आहे. हा सामना झाल्यानंतर संघातील खेळाडूंनी सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे अभिवादन केले आहे. यादरम्यान खेळाडूंनी चाहत्यांना गिफ्ट देखील दिले.

हे सर्व सुरु असताना माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर धावत आले आणि एमएस धोनीचा ऑटोग्राफ घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीचा हा खेळाडू आणि कर्णधार म्हणून शेवटचा हंगाम असू शकतो, असे म्हटले जात आहे. एमएस धोनीने आपल्या चाहत्यांना म्हटलं होतं की, तो शेवटचा सामना चेपॉकच्या मैदानावर खेळणार.

यावर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघाने चेपॉकच्या मैदानावर ४ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला ४ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Latest sports updates)

सुनील गावसकरांनी घेतला ऑटोग्राफ..

हा धोनीचा चेपॉकच्या मैदानावरील शेवटचा सामना होता. त्यामुळे या सामन्यासाठी खास प्लॅनिंग देखील केलं गेलं होतं. सामना झाल्यानंतर एमएस धोनीसह संघातील सर्व खेळाडूंनी चाहत्यांचे आभार मानले.

तसेच प्रेक्षकांना बॉल आणि टी शर्ट गिफ्ट म्हणून देण्यात आले. दरम्यान काहींचं एमएस धोनीसोबत फोटो काढण्याचं आणि ऑटोग्राफ घेण्याचं स्वप्नं पूर्ण झालं. दरम्यान सुनील गावसकर देखील एमएस धोनीचे किती मोठे चाहते आहेत, याचा प्रत्यय आला. ते स्वतः धोनीकडे गेले आणि स्वतःच्या शर्टवर धोनीचा ऑटोग्राफ घेतला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

चेपॉकमध्ये धोनी आणखी काही सामने खेळू शकतो..

रविवारी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेला सामना हा चेन्नईचा साखळी फेरीतील घरच्या मैदानावरील शेवटचा सामना होता. मात्र चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे प्लेऑफमध्ये जाण्याची संधी उपलब्ध आहे.

जर चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. तर धोनी पुन्हा एकदा चेपॉकच्या मैदानावर खेळताना दिसून येऊ शकतो. कारण प्लेऑफचे सामने हे चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

SCROLL FOR NEXT