ms dhoni dance on bole jo koyal youtube
Sports

MS Dhoni Bole Jo Koyal Bago Mein: धोनी स्टेडियममध्ये येताच 'बोले जो कोयल' गाणं का वाजलं? Viral Video मध्ये लपलंय खरं कारण

Ms Dhoni Lookalike Viral Photo: कर्णधार एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

MS Dhoni Dancing On Bole Jo Koyal: एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज सध्या आयपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी करतोय. या संघाने ७ सामने खेळले आहेत. ज्यापैकी ५ सामन्यांमध्ये चेन्नईला विजय मिळवता आला आहे.

तर २ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या या संघातील खेळाडू देखील जोरदार कामगिरी करत आहेत. दरम्यान नेहमी चर्चेत असणाऱ्या कर्णधार एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

एमएस धोनी मैदानात येताच वाजलं गाणं..

एमएस धोनी हा सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.या खेळाडूचा क्रेझ इतका आहे की, वरचे फलंदाज लवकरच बाद व्हावे आणि धोनी फलंदाजीला यावा यासाठी काही फॅन्स प्रार्थना देखील करत असतात. (Ms Dhoni Dance On Bole Jo Koyal Bago Me)

धोनी मैदानात येताच विरोधी संघाला सपोर्ट करायला आलेले फॅन्स देखील धोनी, धोनीच्या घोषणा देऊ लागतात. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात जेव्हा धोनी फलंदाजीला आला त्यावेळी स्टेडियममध्ये असलेल्या डीजे ने बोले जो कोयल हे गाणं वाजवलं.... हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.(Latest sports updates)

व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण काय?

सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात एक व्यक्ती बोले जो कोयल बागो मे गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण असं की, अनेकांनी या व्यक्तीला एमएस धोनीचा ड्युप्लिकेट असल्याचे म्हटले आहे.

या व्यक्तीने धोनी सारखेच केस वाढवले आहेत. मात्र कुठल्याच अँगलने हा धोनी असल्याचे दिसून येत नाहीये, असे काह युजर्सचे मत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालतोय.

धोनीचा आणखी व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यात तो बोले जो कोयल गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

चेन्नईचा आरसीबीवर ८ धावांनी विजय..

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डेवोन कॉनव्हेने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली होती.

तर शिवम दुबेने ५२ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी बाद २२६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून ग्लेन मॅक्सवेलने ७६ धावांची खेळी केली होती. तर फाफ डू प्लेसिसने ६२ धावांची खेळी केली होती. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ८ धावांनी विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

Shravan Somwar Shivamuth: श्रावणात पहिल्या सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाची कडक ॲक्शन; 'किंगडम'चा जबरी ट्रेलर, पाहा VIDEO

Needle-free injection Nagpur: सुई, सूज, वेदना यापैकी काहीच नाही! नागपुरात मिळतंय सुईशिवाय इंजेक्शन

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

SCROLL FOR NEXT