MotoGP Bharat 2023 Saam Tv
Sports

MotoGP Bharat 2023: काय आहे MotoGP Bharat;कुठे पाहता येणार शर्यतीचा थरार, कुठे मिळतील MotoGP Bharatची तिकीटं

MotoGP Bharat Ticket: MotoGP पहिल्या वेळी भारतात होत आहे. पुढच्या वीकेंडला उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये मोटरस्पोर्ट्स इव्हेंट आयोजित करण्यात आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

MotoGP Bharat 2023:

MotoGP पहिल्या वेळी भारतात होत आहे. पुढच्या वीकेंडला उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये मोटरस्पोर्ट्स इव्हेंट आयोजित करण्यात आलाय. जगभरात ज्या वैभवपद्धतीनं या शर्यतीचा सामना होत असतो तसा होणार नाही. परंतु हा सामना पाहण्यासाठी नक्कीच मज्जा येईल. तसेच भारतातही या खेळाची लोकप्रियता वाढू लागलीय. (Latest Sports News)

भारतात होणाऱ्या MotoGPच्या शर्यतीचं १३ वं सत्र असेल. दरम्यान रेसर भरधाव धावणाऱ्या बाईकवर स्वार होऊन विजयाचा झेंडा फडकावतील. सध्या डुकाटीचे इटालियन रेसर फ्रान्सिको बगनाया हे पाचवेळा विजयी झाले आहेत. या विजयासह अव्वल स्थानावर आहेत. यानंतर डुकाटीचा स्पेनमधील जॉर्ज मार्टिन दुसऱ्या स्थानी आहे. मार्टिननं दोनदा विजय मिळवला आहे. इटालियनमधील मार्को बेझेचे सध्या तिसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान या खेळात भारत नवीन आहे. यामुळे विजय किंवा स्पर्धेत टिकणं कठीण राहील.

काय आहे MotoGPचा इतिहास

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास जितका जुना आहे, तितकाच जुना या मोटोजीपीचा आहे. १९४९ मध्ये मोटोजीपीची सुरुवात झाली होती. त्यावेळी पाच श्रेणीमध्ये शर्यत करण्यात येत होती. यात १२५ सीसी, २५० सीसी, ३५० सीसी, ५०० सीसी होते. तसेच यात साइडकारमध्येही शर्यत आयोजित करण्यात येत. पहिल्या दोन दशकामध्ये या श्रेणीत चार स्ट्रोक इंजिनला प्राधान्य होतं. १९६० च्या दशकात दोन स्ट्रोक इंजिनला महत्त्व प्राप्त झालं.

हे आहेत मोटोजीपीचे सुपरहीरो

मोटोजीपीचे विजेत्यांना जगभरात ओळख मिळत असते. त्यांनी जगभरातील सर्किट्सवर वर्चस्व गाजवले आहे. परंतु काही नायक इतरांपेक्षा अधिक खास असतात. यातील जियाकोमो अगोस्टिनीचं उदाहरण घ्या इटालियनने १९७७ मध्ये निवृत्ती होईपर्यंत १९६० आणि १९७० च्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत १५ जागतिक विजेतेपद आणि १२२ ग्रँड प्रिक्स जिंकलेत.

त्यानंतर व्हॅलेंटिनो रॉसीमध्ये आणखी एक इटालियन आहे, ज्याच्या नावावर ९ जागतिक चषक जिंकल्याचा विक्रम आहे. त्याने ८९ शर्यती जिंकल्या आहेत. या दिग्गजामध्ये स्पेनच्या मार्क मार्केजचं नावदेखील आहे. मार्क मार्केज हे भारतात होणाऱ्या स्पर्धेत भाग घेणार आहेत. मार्केज होंडासाठी राइड करतात. त्यांनी ८ विश्व चॅम्पियनशिप जिंकलेत.

MotoGP Bharat चे वेळापत्रक

मोटोजीपी इंडिया इव्हेंट २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर दरम्यान होईल. MotoGP Bharat शुक्रवार, शनिवार आणि रविवार या ३ दिवसांत आयोजित केला जाईल. मुख्य मोटोजीपीच्या शर्यती लॅप्समध्ये होतील. साडेतीन वाजेपासून या शर्यतीला सुरुवात होईल.

MotoGP Bharat कुठे पहता येणार

MotoGP Bharat चे तिकीट बुक माय शोच्या (Book my Show) वरून खरेदी करू शकतात. या तिकीटांचे दर ८०० ते १.८० लाख रुपयांपर्यंत असतील. कमी दराचे तिकीटं काही मिनिटातच विकल्या गेले आहेत.जे लोकांना आपल्या घरात बसून या शर्यतींचा आनंद घ्यायचा असेल तर स्पोर्ट्स १८ वर पाहू शकतात. त्याचबरोबर जिओ सिनेमावर लाइवस्ट्रीमिंग केले जाणार आहे.

कुठे होणार MotoGP Bharat शर्यत

MotoGP Bharat ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे होतील. या ठिकाणी फॉर्म्युला वन शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य मोटोजीपी रेसमध्ये २४ लॅप्स असतील म्हणजेच एकूण राइड अंतर ११८.९७ किलोमीटर असेल. सर्किटवरील एक लॅप ४.९६ किमी अंतर लांब असेल. त्यात उजव्या बाजुला आठ वळण आहेत तर डाव्या बाजुला ५ वळण आहेत. या ट्रॅकची रुंदी १२ मीटर आहे. तर सर्वात लांब सरळ रेषा १, ००६ मीटर असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT