mohit sharma  saam tv
क्रीडा

Mohit Sharma Story : 6 कोटीच्या प्लेअरवर 50 लाखात खेळण्याची वेळ आली! Mohit Sharma चं सॉलिड कमबॅक

Ankush Dhavre

सिद्धेश सावंत

Mohit Sharma Comeback Story: आयपीएल २०२३ स्पर्धेत शनिवारी रोमांचक सामना पार पडला. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ६२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह गुजरात टायटन्स संघाने आयपीएल २०२३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुजरात टायटन्स संघाची फलंदाजी सुरू असताना शुभमन गिलने शतकी खेळी केली.

तर संघाची गोलंदाजी सुरू असताना मोहित शर्माने ५ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या हंगामात मोहित शर्माने दमदार कमबॅक केलं आहे. मात्र त्याचा हा प्रवास सोपा मुळीच नव्हता.

एकदा प्रमोशन झालं की मग खालच्या पोस्टवर काम कसं करायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या सगळ्यांना सणसणीत उत्तर मोहित शर्माने दिलंय. एक मुलगा २०१४ साली आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतो.

पर्पल कॅप होल्डर होतो. नंतर तब्बल दोन वर्ष या मुलाला कुणीच आयपीएलमध्ये आपल्या संघात घेत नाही. कुणाशीच त्याचं कॉन्ट्रॅक्ट होत नाही. मधल्या काळात त्याचे वडील वारतात. दुःखाचा डोंगर कोसळलतो. बॅक इंजरी होते. आयुष्य स्ट्रेसफुल होतं. एकीकडे वय वाढत असचं. दुसरीकडे संधी कमी होत असते. अशातच ज्यांनी ट्रेनिंग दिलं.. क्रिकेट शिकवलं ते कोचही म्हणतात की, आता बसं झालं... तू आता निवृत्ती घे.

सगळीकडेच हताश, निराश असा माहौल असतो. पण तो मुलगा जिद्दीने पेटून उठतो. पर्पल कप मिळाल्यानंतर भारतासाठी दोन वर्ल्डकप खेळण्याची त्याला संधी मिळते खरी. पण नंतर सगळे वारे उलटे वाहू लागतात. त्याच्यावर भयंकर वेळ येते. अपेक्षेची सगळी दारं बंद झालेली असतात. मिळालेलं फेम गमावलेलं असतं.

ज्यांनी एकेकाळी डोक्यावर घेतलं होतं.. त्याला सगळे आता विसरुन गेलेले असतात. वय वाढत असतं. दुसरं काम शोधावं लागणार, या कल्पनेनं हा मुलगा अस्वस्थ होतो. तो पुन्हा मेहनत करु लागतो. क्रिकेटसाठी एक अखेरचं वर्ष स्वतःला आजमवून पाहण्यासाठी तो देतो.. आणि मग पुढे जे होते.. ते एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही.

यश मिळाल्यानंतर ते टिकवणं सगळ्यांना जमतं असं नाही. यश मिळाल्यानंतर अपयशही येतंच. पण पुन्हा यशस्वी होण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी वाघाचं काळीज लागतं. पाय जमिनीवर असावे लागतात. आणि प्रचंड मेहनतीशिवाय पर्याय नसतो.. या सगळ्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मोहित शर्मा...

ते साल होतं २०१४. मोहित शर्मा हे नाव सगळ्यांच्या ओठी होतं. मोहित शर्मा तेव्हा पर्पल कॅप होल्डर होता आयपीएलमध्ये त्याच्या दमदार बॉलिंगने सगळ्यांनाच दखल घ्यायला भाग पडली होती. नंतर मोहितला टीम इंडियात खेळण्याचीही संधी मिळाली. तो टी-ट्वेन्टी वर्ल्डकप खेळला. वनडे वर्ल्डकपही खेळला. आता मागे वळून पाहण्याची काही गरज नाही, असं फेम त्याला मिळू लागलं होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

टीम इंडियात संधी मिळाली होती. जे स्वप्न पाहिलं होतं... ते मोहितने पूर्ण केलं होतं. पण नंतर त्याच्या करीअरला कुणाची नजर लागली, कुणास ठाऊक. मोहित शर्मा टीम इंडियातून बाहेर फेकला गेला. बॅक इंजरीने त्याला पछाडलं.

शरीर साथ देत नव्हतं. मधल्या काळात मोहितचे वडीलही गेले. वडील गेल्याचं दुःखही पडद्या काळात त्याला सोसावं लागलं. आता कमबॅक करण्याचं आव्हान आणखी वाढत गेलं. मोहित शर्माला ज्यांनी २०१४ मध्ये डोक्यावर घेतलं होतं.. २०१८-१९ पर्यंत त्याच मोहितला लोकांनी डोक्यावरुन खाली आणलं होतं.

मोहित खचून गेला होता. इंजरी, टेन्शन, स्ट्रेस, कमबॅकचा विचार आणि प्रश्नांची भली मोठी रांग.. मोहित शर्माला थकवत होती. मोहितच्या कोचने तर हातच टेकले. आता तू राहू दे... दुसरं काही तरी काम बघ.. असं मोहितच्या कोचने त्याला सांगून टाकलं होतं. २०२० आणि २०२१ उजाडलं.. तेव्हा तर हद्दच झाली होती. मोहित शर्माला कुणी आपल्या संघात घेतलंच नाही. कुणाशीच त्यांचं कॉन्ट्रॅक्टही झालं नाही. आता तर जगणंही कठीण झालं होतं. (Latest sports updates)

एकीकडे कमबॅक करण्याची धडपड करायची होती.. दुसरीकडे आता कॉन्ट्रॅक्ट झालं नसल्यामुळे कमाईचाही प्रश्न उभा राहणार होता. त्यामुळे आव्हानं आणखी वाढली. आता मेहनतीशिवाय दुसरा काही पर्याय नाही, हे मोहित शर्माला कळून चुकलं. पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार होती. पण संधी कोण देणार, हा प्रश्न होताच.

अखेर साल २०२२ उजाडलं. गुजरात टायटन्स हा संघ नव्यानंच मैदानात उतरणार होता. त्यांना अनुभवी बॉलरची गरज होती. मोहित शर्मा तेव्हा संधीच्या शोधातच होता. पण गुजरात टायटन्स संघाने नेट बॉलर म्हणून मोहित शर्माला साईन केलं. जो बॉलर टीम इंडियासाठी खेळला, ज्याने एकेकाळी आयपीएलमध्ये पर्पल कॅप कमावली होती.. त्याच्यावर नेटबॉलर होण्याची वेळ ओढवली. पण मोहितने हे काम कमीपणाचं मानलं नाही. नेटबॉलर होण्याची संधी मिळाली, याचा आनंद त्याला जास्त होता.

पण मोहित शर्मा तर सीनिअर... नेट बॉलिंग करताना इगो आड येऊ शकत होता.. नवख्या, ज्युनिअर खेळाडूंना नेटमध्ये बॉलिंग करायची, हे कमीपणाचं वाटण्याची शक्यता होतीच. पण मोहितने तसा विचार केला नाही. उलट तो खेळण्याची संधी मिळतेय.. याचा विचार करु लागला. २०२२मध्ये गुजरातने त्याला नेट बॉलर म्हणूनच खेळवलं. एकही सामना खेळण्याची तेव्हा त्याला संधी मिळाली नव्हती.

पण २०२३मध्ये गुजरातला मोहितच्या टॅलेंटची कल्पना आली होती. आशिष नेहराने मोहित शर्माला संघात घेण्याचं ठरवलं. हार्दिकही मोहित शर्माबाबत पॉझिटिव्ह होता. मोहित शर्माकडे अनुभव होता.

पण त्याच्या वाढलेल्या वयाबद्दल सगळ्यांनाच शंका होती. आयपीएल २०२३च्या पहिल्या तीन मॅचमध्ये मोहितला बेंचवर बसवण्यात आलं. टीममध्ये त्याला स्थान मिळालं नाही. गेल्या ४-५ वर्षांचा काळ आठवून मोहितला तेव्हा काय वाटत असेल, याची आपण फक्त कल्पना करु शकतो. कोणत्याही खेळाडूसाठी अशा परिस्थितीतून जाणं सोपं नसतं. पण मोहित गेला आणि त्यानंतर आता त्याला परफॉर्म करुन दाखवण्याची संधी चालून आली होती. पण तीन मॅचमध्ये खेळताच आलं नव्हतं. संघात स्थान मिळालं असलं तरी मॅचमध्ये खेळण्यची संधी मिळेल की नाही, याची खात्री नव्हती.

अखेर गुजरातची चौथी मॅच खेळण्याची संधी मोहितला मिळाली...आणि त्याने दोनशे टक्के देत कमाल कमबॅक केलं. पंजाब विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने ४ ओव्हर टाकले. फक्त १८ रन्स दिले आणि दोन विकेट घेतल्या. इतकंच नाही, तर मॅन ऑफ दी मॅचही ठरला. २०२३च्या आयपीएलचा सर्वाधिक विकेट टेकर्सचा चार्ट बघाल, तर त्यात मोहित शर्मा तिसऱ्या स्थानी आहे. मुंबई विरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात मोहित शर्माने गेलेली बॉलिंग सगळ्यांच्याच लक्षात राहिलेय.

जो खेळाडू वर्ल्डकप खेळलाय, जो खेळाडू पर्पल कॅप होल्डर होता.. जो खेळाडू नॅशनल लेव्हलवर टीम इंडियाला रिप्रेझेंट करुन झालाय.. त्याने नेटबॉलर होण्याचा घेतलेला निर्णय सोपा नव्हता.

वयाच्या २५व्या वर्षी करीअरच्या पिक वर असलेला एक प्लेअर... करीअरमध्ये कमबॅक करण्यासाठी आपला इगो बाजुला ठेवतो.. आणि यशस्वी होऊन दाखवतो.. हेच मोहित शर्माकडे पाहिल्यावर कळतं. त्यामुळे कोईभी काम छोटा नहीं होता.. आणि काम से बडा कोई नहीं होतं, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: योगायोग की आणखी काही...; टीम इंडिया फ्लॉप ठरताच अजिंक्य रहाणेने केली सूचक पोस्ट, म्हणाला...!

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT