suryakumar yadav twitter
क्रीडा

Mohit Sharma Bowling: ‘सूर्याने ६ सिक्स मारले असते तरी फरक पडला नसता…’, सामन्यानंतर मोहित शर्माचे मोठे वक्तव्य

Ankush Dhavre

GT vs MI, Qualifier 2: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला ६२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडुन सुर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. इतर कुठलाही फलंदाज त्याच्याइतक्या धावा करु शकला नाही.

दरम्यान त्याची विकेट घेणाऱ्या मोहित शर्माने सामन्यानंतर आपल्या रणनीतीबाबत खुलासा केला आहे.

सुर्यकुमार यादवला बाद करण्यासाठी गुजरातचा खास प्लॅन..

सुर्यकुमार यादव हा असा फलंदाज आहे जो कुठल्याही क्षणी फलंदाजीला येऊन सामना फिरवू शकतो. २३४ धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने ३८ चेंडूंचा सामना करत ६१ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. सूर्यकुमार यादव जर शेवटच्या षटकापर्यंत टिकला असता तर नक्कीच मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला असता. मात्र १५ व्या षटकात त्याला मोहित शर्माने बाद करत माघारी धाडले.

हा सामना झाल्यानंतर त्याने आपल्या रणनीतीबाबत खुलासा केला आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'मी थोडा नशिबवान आहे की, मला लवकर ५ गडी बाद करता आले. चेंडू खेळपट्टीवरून स्किट होत होता.

मात्र ज्याप्रकारे सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा फलंदाजी करत होते, ते पाहून असं वाटत होतं की जर हे दोघे उभे राहिले तर सामना जाऊ शकतो. मी ठरवलं होतं की, मी जर सूर्यकुमार यादव समोर गोलंदाजी करत असेल तर मी जास्त प्रयोग करणार नाही. (Latest sports updates)

सहा षटकार मारले तरी फरक नसता पडला..

तसेच तो पुढे म्हणाला की, 'आम्ही मिटिंगमध्ये चर्चा केली होती. त्यात असं ठरलं होतं की, सूर्यकुमार यादवला आउट करण्याचा जास्त प्रयत्न करायचा नाही. आपण प्रयत्न करत असलं की, त्याच्यासाठी हे आणखी सोपं होऊन जातं.

त्यामुळे आम्ही लेंथ गोलंदाजी करत होतो. जरी आम्हाला षटकार मारले असते तरी फरक पडला नसता. कारण आम्हाला वाटत होतं की, तो ज्या प्रकारचे शॉट खेळतो ते या लेंथवर खेळणं कठीण आहे. त्यावेळी मॅच संपली नव्हती. मात्र सूर्यकुमार यादवला केल्यानंतर आम्हाला वाटलं की, आम्ही मॅचमध्ये आहोत.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT