IPL 2023 Final: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हा सामना रविवारी (२८ मे) होणार होता. मात्र या दिवशी जोरदार पावसामुळे सामना रद्द केला गेला होता.
त्यानंतर रिझर्व्ह डे म्हणजेच सोमवारी (२९ मे) हा सामना खेळवला गेला होता. या सामन्यात चेन्नईने बाजी मारत पाचव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली.
दरम्यान सुरुवातीचे ४ चेंडू अचूक टप्प्यावर टाकणाऱ्या मोहितचे शेवटचे २ चेंडू चुकीच्या टप्प्यावर कसे पडले? जाणून घ्या नेमकं काय घडलं.
अंतिम षटकात नेमकं काय घडलं ?
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवण्यासाठी १५ षटकांमध्ये १७१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना अंतिम षटकात चेन्नई सुपर किंग्ज संघाला १३ धावांची गरज होती.
या धावांचा पाठलाग करताना मोहित शर्मा गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी रविंद्र जडेजा आणि शिवम दुबे ही जोडी मैदानावर होती. सुरुवातीचे ४ चेंडू अचूक टप्प्यावर पडले होते. या ४ चेंडूंवर त्याने केवळ ३ धावा खर्च केल्या होत्या. अंतिम २ चेंडूंवर चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजयासाठी १० धावांची गरज होती.
पाचव्या चेंडूवर जडेजाने षटकार मारला आणि चेन्नईचं या सामन्यात कमबॅक झालं. अंतिम चेंडूवर चेन्नईला ४ धावांची गरज होती. जडेजाने चौकार मारला आणि चेन्नईने या सामन्यात विजय मिळवला. (Latest sports updates)
शेवटच्या २ चेंडूंवर नेमकं काय घडलं?
मोहित शर्माने या संपूर्ण स्पर्धेत जोरदार कामगिरी केली आहे. अंतिम षटकात देखील तो चांगल्या रिदममध्ये गोलंदाजी करत होता. सुरुवातीचे ४ चेंडू त्याने अचूक टप्प्यावर टाकून फलंदाजांना गुंतवून ठेवलं होतं.
मात्र चौथा चेंडू टाकल्यानंतर हार्दिक पंड्या त्याच्या जवळ आला आणि दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली. त्यानंतर त्याचा पूर्ण रिदम बिघडला, असं म्हटलं जात आहे.
मात्र मोहित शर्माने याबाबत बोलताना म्हटले आहे की, 'हार्दिक पंड्या आणि माझ्यात काही असं बोलणं झालं नव्हतं. त्यालाही माहित होतं मी काय करणार आहे. मला यॉर्कर चेंडू टाकायचा होता. लोकं जे बोलताय ते चुकीचं आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.