Mohammed Siraj google
Sports

Mohammed Siraj: चॅम्पियन्स ट्रॉफीची हुकलेली संधी अजूनही जिव्हारी! मोहम्मद सिराजने अखेर मौन सोडले, खंत व्यक्त करत म्हणाला...

Mohammed Siraj On Getting Dropped for Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला स्टॅंडबायवर ठेवण्यात आलं होत. तो चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग नव्हता. यावर सिराजने पुन्हा एकदा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयपीएल २०२५ च्या १९ व्या सामन्यात मोहम्मद सिराजने गुजरात टायटन्सला सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवून दिला. त्याने ४ ओव्हमध्ये १७ धावा देऊन ४ विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. यानंतर मोहम्मद सिराजने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून वगळण्यात आल्याबद्दल खंत व्यक्त करत मौन सोडले आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघातून मला का वगळण्यात आले हे मला समजलचं नाही, असे सिराजने म्हटले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी सिराजला संघातून वगळण्यात आलं होतं. त्याला स्टँडबायवर ठेवण्यात आलं होतं. आता सिराजने आयपीएलमधील आपल्या दमदार कामगिरीने टीकाकारांना उत्तर दिले आहे. आणि निवडकर्त्यांना हे देखील दाखवून दिले की, तो भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. सिराजने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत नऊ विकेट्स घेतल्या आहेत आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधीही संघात स्थान न मिळाल्याबद्दल मोहम्मद सिराजने आपले दुःख व्यक्त केले होते.

फिटनेसवर काम केले

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात सिराजने ४ ओव्हरमध्ये १७ धावा देऊन ४ विकेट्स घेतले. यामुळे गुजरातने हैदराबाद संघाला १५२ धावांवर रोखले. गुजरात टायटन्सने १७ ओव्हरमध्ये सात गडी राखून हैदराबादवर दमदार विजय मिळवला. सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी मोहम्मद सिराज ला मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड देखील देण्यात आला. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सिराज म्हणाला की, 'चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात माझी निवड का करण्यात आली नाही, हे मला समजलचं नाही, पण मी माझा उत्साह कायम ठेवला आणि यावेळी माझ्या फिटनेसवर काम केले'.

आयपीएल २०२५ ची वाट पाहत होतो

सिराज म्हणाला, 'मी ज्या काही चुका करत होतो, त्यावर मी काम केले. आता मी माझ्या गोलंदाजीचा आनंद घेत आहे. एक खेळाडू म्हणून, जेव्हा तुम्ही सतत भारतीय संघासोबत असता, तेव्हा तुमच्या मनात शंका निर्माण होतात की, तुम्ही संघातून कसे बाहेर पडलात, पण मी स्वतःला मोटीव्हेट केले आणि आयपीएलवर लक्ष केंद्रित केले. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करण्याची योजना आखता आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही टॉपवर पोहचता. जेव्हा तुम्ही चेंडू आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी सहजरित्या स्विंग करता , तेव्हा तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळतो.

१०० विकेट्स घेण्याचा विक्रम

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध ४ विकेट्स घेतल्यानंतर, मोहम्मद सिराज आयपीएलमधील सर्वात जलद १०० विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. या यादीत त्याने जहीर खानला देखील मागे टाकले आहे. सिराजने ९७ सामन्यात १०० विकेट्स घेण्याचा विक्रम रचला तर जहीर खानने ९९ सामन्यात १०० विकेट्स घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT