mohammed siraj twitter
Sports

World Cup Final : सिराजनं वडिलांसाठी व्यक्त केली खास इच्छा! पोस्ट शेअर करत म्हणाला...

Mohammed Siraj Instagram Story: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहचल्यानंतर मोहम्मद सिराजने वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Ankush Dhavre

Mohammed Siraj Emotional Instagram Story For Father:

वर्ल्डकप सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडचा धुराळा उडवत भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. वर्ल्डकप फायनलचा सामना येत्या १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे.

तर दुसरा सेमीफायनलचा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना करताना दिसून येणार आहे.

मोहम्मद सिराज भावूक...

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी करताना दिसून आला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात महत्वपूर्ण स्पेल टाकली होती. त्यानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्येही त्याने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मोहम्मद सिराजने आपल्या वडीलांसाठी एक खास स्टोरी शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वडीलांसाठी शेअर केली खास पोस्ट...

मोहम्मद सिराजने आपल्या वडिलांना आठवण करत एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या स्टोरीमध्ये वडिलांचा कॉल येत असल्याचं दिसून येत आहे. या फोटोवर त्याने कॅप्शन म्हणून लिहीलं की, ' हा कॉल पाहण्याची माझी इच्छा आहे.' मोहम्मद सिराजला आपल्या वडिलांची आठवण येत असल्याचं दिसून येत आहे. मोहम्मद सिराजला पुढे आणण्यात त्याच्या वडिलांचाही मोलाचा वाटा आहे. (Latest sports updates)

२०२० मध्ये झालं वडिलांचं निधन..

मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरु होता. आपल्या वडिलांच्या आठवणीत नेहमीच तो सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; वाळूने भरलेल्या ट्रकने तिघांना चिरडलं, अपघातानंतर चालक फरार

मोठी बातमी! घरात AC, कार रेशन कार्ड रद्द होणार? 70 लाख रेशनधारकांना फटका बसणार

राज्यपाल हरिभाऊ बागडेंची प्रकृती बिघडली, ICU मध्ये उपचार सुरू; उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हॉस्पिटलमध्ये गर्दी

Palghar Tourism : पालघरमध्ये लपलाय एक ऐतिहासिक किल्ला, ट्रेकर्ससाठी खास आकर्षण आहे 'हे' ठिकाण

इराणने दिला आरपारचा इशारा, माघारीस नकार, युद्ध लांबणार

SCROLL FOR NEXT