Mohammadreza Shadlou  twitter
Sports

Pro Kabaddi League Auctions: इराणचा स्टार बनला 'पुणेकर', शादलूवर लागली प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील विक्रमी बोली

Mohammadreza Shadlou : शादलूवर प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे.

Ankush Dhavre

Mohammadreza Shadlou PKL Auction:

इराणचा युवा खेळाडू मोहम्मदरेजा शादलूवर प्रो कबड्डी स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी बोली लागली आहे. प्रो कबड्डीच्या १० व्या हंगामासाठी ऑक्शन सुरू आहे. सोमवारी (९ ऑक्टोबर) ऑक्शनचा पहिला दिवस पार पडला.

दरम्यान पहिल्या दिवशी मोहम्मदरेजा शादलू कोट्यवधी बनला आहे. पुणेरी पलटनने मोहम्मदरेजा शादलूवर २ कोटी ३५ लाखांची बोली लावली आहे.

मोहम्मदरेजा शादलूला आपल्या संघात स्थान देण्यासाठी सर्वच संघांनी बोली लावली. शेवटी पुणेरी पलटनने बाजी मारली.

मोहम्मदरेजा शादलूची बेस प्राईज ३० लाख रूपये इतकी होती. यू-मुंबाने त्याच्यावर पहिली बोली लावली. त्यानंतर बंगाल वॉरियर्स,युपी योद्धा आणि गुजरात जायंट्सने देखील बोली लावायला सुरूवात केली. मोहम्मदरेजा शादलूला आपल्या संघात स्थान देण्यासाठी या सर्व संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटी पुणेरी पलटनने बाजी मारत मोहम्मदरेजा शादलूला आपल्या संघात स्थान दिलं. (Latest sports updates)

मोहम्मदरेजा शादलूपूर्वी भारतीय कबड्डी संघाचा कर्धणार पवन सेहरावत प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पवन सेहरावतवर २.२६ कोटींची बोली लागली होती.

मोहम्मदरेजा शादलूच्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने पटना पायरेट्स संघाकडून या स्पर्धेत पदार्पण केलं होतं. ८ व्या हंगामात त्याने पक्कड करताना ८९ गुणांची कमाई केली होती. तर नवव्या हंगामात त्याने पक्कड करताना ८४ गुणांची कमाई केली होती. आतापर्यंत खेळलेल्या ४४ सामन्यांमध्ये त्याने १८३ गुणांची कमाई केली आहे. याच कामगिरीच्या बळावर तो महागडा खेळाडू ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT