टी-२० वर्ल्डकप आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलाय. उद्या म्हणजेच ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी सेमीफायनल रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.
एका टीव्ही शो दरम्यान आमिरने टीम इंडियाबाबत एक नवं भाकित केलं आहे. आमिर म्हणाला की, यावेळी भारत फायनलपर्यंत पोहोचणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागेल.
मुख्य म्हणजे आमिरने यापूर्वी असा दावा केला होता की, भारत सुपर ८ टप्प्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पराभूत होईल. भारत सेमीफायनलपर्यंत पोहोचणार नाही असं आमिरने म्हटलं होतं. दरम्यान त्याचं हे भाकित टीम इंडियाने खोटं ठरवलं. वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताने सेमीफायनलचं तिकीट मिळवलं.
दरम्यान आता सेमीफायनलचा सामना रंगण्यापूर्वी आमिरने अजून एक विचित्र विधान केलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, टीम इंडिया सध्या कंप्लीट क्रिकेट खेळण्यासाठी संघर्ष करताना दिसतेय. जसप्रीत बुमराह सोडून इतर गोलंदाज फॉर्ममध्ये नाहीत.
इतंकच नाही तर आमिरने भारतीय फलंदाजीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तो म्हणाला की, प्रत्येक सामन्यात टीम दबावाखाली असल्याचं दिसतंय. दरम्यान भारतीय फॅन्सर आमिरच्या विधानाला फारसं गांभीर्याने घेत नाहीत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलचा ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये या दोन्ही टीम्स एकमेकांसमोर येण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.
२०२२ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. परंतु २०२४ मध्ये टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं आणि सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा ६८ रन्सने पराभव केला. तर यंदा २०२६ मध्येही या दोघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.