Rishabh Pant ANI
Sports

Rishabh Pant: IPL मध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करणार? NCAकडून ग्रिन सिग्नल पण मात्र वेगळीच

IPL 2024 : आयपीएल (IPL) 2024 दिल्लीच्या संघासाठी आनंदाची बातमी आहे. एससीएच्या माहितीनुसार ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी फिट असून तो संघाचं नेतृत्त्व करू शकतो अशी शक्यता वर्तवली जातेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rishabh Pant IPL 2024 :

आयपीएल दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी आहे. दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार ऋषभ पंत आता आयपीएल खेळण्यासाठी तंदुरुस्ती असल्याची माहिती एससीएकडून देण्यात आली आहे. एनसीएकडून ऋषभला फिटनेस सर्टिफिकेट देत तंदुरुस्त असल्याचं जाहीर करण्यात आले आहे.(Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार,पंतला एनसीएकडून आयपीएल खेळण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएल २०२४ च्या सर्व सामन्यांमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान २२ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या माजी कर्णधारांची हेल्थ अपडेट समोर आल्याने संघात आणि संघ व्यवस्थापकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्ली कॅपिटल्सच्या संघात पंत नसणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होत होत्या. ऋषभ पंतला फिटनेस क्लिअरंस रिपोर्ट मिळालेले नसल्यानं दिल्ली कॅपिटल्सच्या टीमला बीसीसीआयकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाहीये. दरम्यान ऋषभ पंत सध्या आयपीएल २०२४ च्या प्रॅक्टिसमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर तो काही दिवसांसाठी दिल्लीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएलचे सुरुवातीचे सामने दिल्लीची टीम विशाखापटनममध्ये खेळणार आहे. त्यामुळे फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ऋषभ पंत डायरेक्ट वायझॅग येथे पोहोचण्याची शक्यता आहे.

ऋषभ पंतआगामी आयपीएलमध्ये फलंदाज म्हणून खेळणार की, कर्णधार म्हणून खेळणार याबाबत दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने माहिती दिलेली नाही. याशिवाय संघाने ऋषभबद्दल कोणतीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. दिल्ली कॅपिटल्स पंतचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करियर पाहता त्याच्यावर कोणताही दबाव टाकणार नाही. ऋषभ या पुढे यष्टीरक्षक म्हणून देखील खेळणार नसल्याची माहिती मिळते.

दिल्ली कॅपिटल्सची टीमचं नाही तर पंतचे चाहते त्याच्या पुनरागमनासाठी खूप उत्सुक आहे. कारण गेल्या सामन्यांमध्ये तो नसताना दिल्ली कॅपिटल्सची आयपीएलमधील कामगिरी काहीशी डगमगताना दिसत होती. त्यामुळे संघात त्याची दमदार एंट्री व्हावी, असे सर्वांनाच वाटते. दिल्ली कॅपिटल्सचाचा पहिला सामना २३ मार्च रोजी पंजाब किंग्जविरुधात खेळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT