Michael Vaughan ICC T20 World Cup top 4 teams Prediction said these 4 teams will go in semi final excluding india amd2000 twitter
Sports

ICC T20 World Cup 2024: मायकल वॉनची मोठी भविष्यवाणी! म्हणतो, टीम इंडिया नव्हे तर हे ४ संघ जाणार सेमीफायनलमध्ये

Michael Vaughan ICC T20 World Cup Prediction: आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत कोणते ४ सेमीफायनलमध्ये जाणार, याबाबत मायकल वॉनने मोठी भविष्यवाणी केली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. या स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानने आपल्या संघाची घोषणाा केली आहे. या सर्व संघांनी आपला १५ सदस्यीस संघ जाहीर केला आहे. दरम्यान संघांची नावं समोर येताच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने मोठी भविष्यावाणी केली आहे. त्याने कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात. याबाबत आपलं मत मांडलं आहे. मुख्य बाब म्हणजे त्याने भारतीय संघाचं नावं घेतलेलं नाही.

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार असा प्रश्न विचारला असता, मायकल वॉनने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारतीय संघाचं नाव घेतलं होतं. या स्पर्धेत भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. त्याने केलेल्या भविष्यवाणीनूसार, केवळ २ संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. तर इंग्लंडला सातव्या आणि पाकिस्तानला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी या ४ संघांची केली निवड...

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत सर्वच संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मायकल वॉनच्या मते, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडीजचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो. या स्पर्धेसाठी वेस्टइंडीज वगळता उर्वरीत ३ संघांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. मायकल वॉनच्या मते भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकणार नाही. मात्र आतापर्यंत त्याचे अनेक अंदाज चुकीचे ठरले आहेत. त्यामुळे यावेळीही भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो.

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या १ जूनपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंत आणि संजू सॅमसनला स्थान देण्यात आलं आहे. तर सलामीवीर फलंदाज म्हणून यशस्वी जयस्वालला मुख्य संघात स्थान देण्यात आलं आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Voter: मुलगा 'मराठी अन् बाप गुजराती'; कुठे नावात तर कुठे जेंडरमध्ये बदल; आदित्य ठाकरेंकडून बोगस मतदारयाद्यांची पोलखोल

Amit Shah: अमित शाहांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ; शिंदेसेना-राष्ट्रवादीत अस्वस्थता

Maharashtra Live News Update: चेंबूरमध्ये उड्डाणपुलाखाली खडी मिक्सर मशीन ट्रक अडकला

Shocking : छठ पूजेदरम्यान सेल्फी घेताना होडी उलटली; तिघे तरुण नदीत बुडाले

Phaltan Doctor Case:सातारा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांच्या हाती लागले डॉक्टर आणि आरोपीमधील चॅटिंग अन् सीसीटीव्ही फुटेज

SCROLL FOR NEXT