आगामी आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. या १५ सदस्यीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिचेल मार्शकडे सोपवण्यात आली आहे. तर स्टीव्ह स्मिथसारख्या अनुभवी खेळाडूला या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेत तुफान कामगिरी करणाऱ्या फलंदाजाला या संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी कॅमरून ग्रीनचा ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे. सध्या आयपीएल २०२४ स्पर्धेत तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या संघाकडून खेळताना त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. तसेच ऑस्ट्रेलियासाठी तो २०२२ मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तब्बल १८ महिने संघाबाहेर राहूनही निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ८ टी -२० सामन्यांमध्ये १३९ धावा केल्या आहेत.
आयपीएल २०२४ स्पर्धेत आणि बिग बॅश लीग स्पर्धेत धमाल कामगिरी करणाऱ्या जॅक फ्रेजर मॅकगर्कला ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्याच्या नावे लिस्ट ए क्रिकेटमध्ये २९ चेंडूत शतक झळकावण्याची नोंद आहे. तर २०१४ पासून प्रत्येक टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी गोलंदाजी आक्रमणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कुठलाही बदल केलेला नाही. या संघात मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि ॲडम झाम्पासारख्या गोलंदाजांना स्थान देण्यात आलं आहे.
मिचेल मार्श (कर्णधार), एश्टन एगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यु वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.