MI beat UP Warriors by 8 wickets Twiiter
Sports

MI Vs UPW: मुंबईचा विजयी चौकार! हरमनप्रीतच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर UP वॉरियर्सचा 8 विकेटनी धुव्वा

WPL 2023 : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगमध्ये आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. मुंबईने यूपी वॉरियर्सनला पराभूत करत सलग चौथा विजय मिळवला आहे.

Chandrakant Jagtap

WPL 2023: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगमध्ये आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. मुंबईने यूपी वॉरियर्सनला पराभूत करत सलग चौथा विजय मिळवला आहे. रविवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह मुंबई गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे.

प्रथम गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सला 6 विकेट्सवर 159 धावांत रोखले आणि त्यानंतर 17.3 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. हरमनप्रीत कौरने 33 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 53 धावांची तुफानी खेळी केली आणि नताली सिव्हर-ब्रंटने 31 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 45 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी 63 चेंडूत 106 धावांची भागीदारी केली. WPL 2023 मधील हरमनप्रीतचे हे दुसरे अर्धशतक आहे. (Latest Sports News)

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा चार सामन्यांतील हा सलग चौथा विजय आहे. मुंबई संघाने स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. चार सामन्यात सलग विजयासह संघाचे आता 8 गुण झाले आहेत. संघाचा नेट रन रेट आता 3.524 झाला आहे. त्याचवेळी यूपी वॉरियर्सला चार सामन्यांमधला दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. यूपी संघ चार गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि नेट रनरेट 0.015 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

हृदयद्रावक! सर्पदंशाने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; कुटुंबीयांनी सापच आणला रुग्णालयात

Chanakya Niti : चाणक्यांच्या या 6 सायलेन्स स्टॅटर्जी शत्रूला करतील कमजोर

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील पेडी नदी पुलावर भीषण अपघात

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, १४ दिवसांसाठी जमावबंदी; काय सुरू अन् काय बंद?

SCROLL FOR NEXT