Ishan Kishan  x
Sports

Ishan Kishan MI VS SRH : इशान किशनने बांधिलकी जपली अन् हैदराबादच्या चाहत्यांची 300 धावांची आशा धुळीस मिळवली

MI VS SRH IPL 2025 : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना वानखेडेवर रंगला आहे. टॉस जिंकून मुंबईने गोलंदाजी करण्याचे निवडले. दरम्यान सनरायजर्स हैदराबादकडून खेळणारा इशान किशन फक्त २ धावा करुन माघारी परतला.

Yash Shirke

वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराजयर्स हैदराबाद हा महामुकाबला रंगला आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सनरायजर्स हैदराबादचे खेळाडू मैदानात फलंदाजीसाठी उतरले. या सामन्यात इशान किशनच्या स्टंपआउटची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

आठव्या ओव्हरमध्ये विल जॅक्स गोलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा इशान किशन आणि ट्रेव्हिस हेड फलंदाजी करत होते. दरम्यान ओव्हरच्या चौथ्या बॉलवर इशान किशनने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांमध्ये त्याची विकेट पडली. बॉल इशानच्या टप्प्यातून सुटला आणि विकेटकिपर रायन रिकल्टनच्या हातात गेला. रायनने लगेच इशानला स्टंपआउट केले.

सनरायजर्स हैदराबादने इशान किशनवर ११.२५ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्याआधी इशान मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी मुंबईने त्याला रिटेन केले नव्हते. पुढे लिलावात मुंबईने त्याच्यावर बोली न लावल्याने हैदराबादने इशानला संघात समाविष्ट केले होते. रिटेन न केल्याने आणि संघात सामील न केल्याने इशान किशन मुंबईच्या संघावर रागावला होता अशा चर्चा रंगल्या होत्या. मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून खेळताना तुफान फटकेबाजी करुन सर्वाधिक धावा करेल असे म्हटले जात होते. पण आजच्या सामन्यात इशान किशन फक्त २ धावांवर बाद होऊन माघारी परतला.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा.

सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT