mumbai indians
mumbai indians saam tv
क्रीडा | IPL

IPL 2023 MI vs RR Match: IPL च्या १६ वर्षांच्या इतिहासात '३० एप्रिल' ही तारीख नेहमी लक्षात ठेवली जाईल, वाचा नेमकं काय घडलं?

Ankush Dhavre

IPL 2023: रविवारी आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील ऐतिहासिक सामना पार पडला. १००० व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात शेवटच्या षटकात मुंबईने बाजी मारली आणि जोरदार विजय मिळवला.

दरम्यान या ऐतिहासिक सामन्यात असा काही विक्रम घडला,जो यापूर्वी कधीच घडला नव्हता.

आयपीएल स्पर्धेतील १००० वा सामना हा वानखेडेच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २१२ धावा केल्या. या धावांचा मुंबई इंडियन्स संघाने यशस्वी पाठलाग केला. तर डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २०० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाने यशस्वी पाठलाग केला. दरम्यान आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी ४ वेळेस २०० धावांचा डोंगर रचला गेला. (Latest sports updates)

अंतिम षटकात टीम डेविडचे षटकार..

या सामन्यात मुंबईला २१३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला अंतिम षटकात १७ धावांची गरज होती. अंतिम षटकात १७ धावांचा पाठलाग करताना फलंदाज दबावात असतो. मात्र यावेळी गोलंदाजी करत असलेला जेसन होल्डर दबावात असल्याचे दिसून आले. अंतिम षटक सुरू होण्यापूर्वी असे वाटत होते की, राजस्थान रॉयल्स हा संघ जिंकणार. मात्र पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर टीम डेविडने षटकारांची हॅट्रिक केली आणि आपल्या संघाला जोरदार विजय मिळवून दिला.

जयस्वालचे यशस्वी शतक..

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईकर यशस्वी जयस्वाल मुंबईच्या गोलंदाजांवर चांगलाच बरसला. त्याने या सामन्यात ६२ चेंडूंचा सामना करत १६ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १२४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने ७ गडी बाद २१२ धावा केल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT