mi vs rcb virat kohli fans were chanting chiku chiku virat's funny reaction catched attention  twitter
Sports

Virat Kohli Funny Dance: फॅन्सकडून चिकू..चिकूच्या घोषणा! विराटने दिलेली मजेशीर रिॲक्शन व्हायरल - VIDEO

Virat Kohli Viral Dance Video: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान विराटने मजेशीर डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा माजी कर्णधार विराट कोहली जेव्हा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर येतो त्यावेळ तो आपल्या फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन करतो. दरम्यान जेव्हा ता क्षेत्ररक्षण करत असतो तेव्हा तो आपल्या डान्स आणि हटके मुव्ह्सने क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन करतो. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने हार्दिक पंड्याला ट्रोल करु नका अशी मागणी केली होती. दरम्यान हा सामना सुरु असताना त्याने असं काही केलं आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तर झाले असे की, मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा स्ट्राईकवर होता. त्यावेळी विराट कोहली सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी विराटला पाहून चिकू..चिकूच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. चिकू हे विराट कोहलीचं निकनेम आहे. ज्यावेळी तो एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचा त्यावेळी एमएस धोनी त्याला चिकू म्हणून हाक मारायचा.

चिकू.चिकू ऐकून विराटने दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फॅन्स एकसुरात चिकू..चिकूच्या घोषणा देत होते. हे ऐकताच विराटने ठुमके मारायला सुरुवात केली. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्य बाब म्हणजे हा सामना झाल्यानंतर विराटने हार्दिक पंड्याला मिठी देखील मारली होती. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून ३ फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २० षटकअखेर १९६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाने २७ चेंडू आणि ७ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT