IPL 2024 saam digital
क्रीडा

IPL 2024: मुंबईचा खरा कर्णधार रोहित शर्माच? जर्सी लॉन्चमधील व्हायरल व्हिडिओवरुन चर्चेला उधाण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Indians Jersey Launch Video

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी क्रिकेट विश्वातून अनेक बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयकडून आयपीएलच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात करण्यात आलं होतं. मात्र आता आयपीएलमधील बहुचर्चित असलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या नव्या पर्वासाठी नवीन जर्सी लॉन्च केली आहे. या जर्सी (Jersey)लॉन्चचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच क्रिकेट फॅन्समध्ये वेगळीच चर्चा रंगू लागली आहे..('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईचा संघ आपल्या शानदार कामगिरीमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र संघातील कर्णधार बदल्यामुळे मुंबईचा संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल(IPL) २०२४ स्पर्धेसाठी हार्दिक पंड्याची मुंबईच्या कर्णधारपदी निवड केली गेली आहे. त्यानंतर क्रिकेट विश्वात असंख्य चर्चा झाल्या. प्रत्येक गोष्टीत संघाच्या कर्णधाराला प्रथम प्राधान्य दिलं जातं. मात्र जर्सी लॉन्चच्या प्रोमोमध्ये भलतंच चित्र पाहायला मिळालं आहे.

मुंबई इंडियन्सने नव्या जर्सीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सच्या नव्या जर्सीची झलक पाहायला मिळत आहे. व्हिडिओत तुम्ही पुढे पाहू शकता की, मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा मुंबईच्या नव्या जर्सीत झळकताना दिसतोय. त्यानंतर सूर्यकुमार यादव ,इशान किशन आणि जसप्रीत बुमराहसह मुंबई संघातील अन्य खेळाडू दिसतात. त्यानंतर मुंबईचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पंड्या ८ क्रमांकाची जर्सी परिधान करताना दिसतोय.

हार्दिक पंड्या मुंबईचा कर्णधार आहे. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला तो आधी दिसायला हवा होता. मात्र हार्दिक आधी रोहित दिसून आला. संघाच्या महत्वपूर्ण वेळेला संघाचा कर्णधार सुरुवातीस दिसतो. मात्र यावेळेला असे झाले नाही. यामागचं नेमकं कारण काय? कर्णधार हार्दिक असला तरी मुंबईचा खरा कर्णधार रोहितच असल्याच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावापूर्वी त्याचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं. त्याच्याऐवजी हार्दिक पंड्याला संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT