lionel messi  saam tv
Sports

Messi Offer Amount: अबब.. मेस्सीला रोनाल्डोपेक्षाही दुप्पट रकमेची ऑफर! किंमत ऐकून आकडीच येईल

Al -Hilal Offer To Lionel Messi: सौदी अरेबियातील फुटबॉल क्लबने लिओनेल मेस्सीला एक मोठी ऑफर दिली आहे.

Ankush Dhavre

Lionel Messi: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याची लोकप्रियता ही जगभरात पसरलेली आहे. लवकरच त्याचा पॅरिस- सेंट जर्मनसोबत असलेला कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे.

दरम्यान आता रोनाल्डोनंतर सौदी अरेबियातील फुटबॉल क्लबने लिओनेल मेस्सीला एक मोठी ऑफर दिली आहे. (Al -Hilal Offer To Lionel Messi)

सौदी अरेबियाचे सरकार आता अर्जेंटीनाच्या कर्णधारासोबत चर्चा करत आहे. दरम्यान आतापर्यंत कुठल्याही खेळाडूला मिळालं नसेल इतकं मानधन देण्याच्या तयारीत आहे. द टेलिग्राफने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मेस्सीला सौदी प्रो लीगमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

यासाठी सौदी अरेबियातील क्लब अल- हिलाल त्याला दरवर्षी ४० कोटी अमेरिकन डॉलर्स देण्याच्या तयारीत आहे. तर रोनाल्डोला अल- निसार संघाचे प्रतिनिधित्व करतोय. या संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्याला वर्षाला २० कोटी अमेरिकन डॉलर्स इतके मानधन दिले जात आहे. जे मेस्सीला मिळणाऱ्या मानधनापेक्षा निम्मे आहे. (Latest sports updates)

मेस्सी पॅरिस- सेंट जर्मन संघाची साथ सोडणार?

फ्रांसची वृत्तसंथा इक्चिपने म्हटले होते की, लिओनेल मेस्सी लवकरच मेस्सी पॅरिस- सेंट जर्मन संघाची साथ सोडू शकतो. कारण मेस्सी आपल्या कुटुंबासोबत सौदी अरेबियात फिरायला गेला असता. मेस्सी पॅरिस- सेंट जर्मन संघाने त्याच्यावर कारवाई केली आहे. या संघाने त्याच्यावर २ आठवड्यांची बंदी घातली आहे.

याच कारणामुळे तो या संघाची साथ सोडू शकतो. तसेच लवकरच त्याचा या संघासोबत असलेला करार देखील समाप्त होणार आहे. मेस्सी आपली पत्नी आणि मुलांसह सौदी अरेबिया फिरायला गेला होता.

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धा जिंकून देण्यात लिओनेल मेस्सीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. लिओनेल मेस्सी येणाऱ्या महिन्यात ३६ वर्षांचा होणार आहे. रविवारी तो पॅरिस सेंट-जर्मेनसाठी लीग १ मध्ये लॉरिएंट संघाविरुद्ध सामना खेळताना दिसून आला होता. या सामन्यात लॉरिएंट संघाने जोरदार कामगिरी करत पॅरिस सेंट-जर्मेनचा ३-१ ने धुव्वा उडवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

SCROLL FOR NEXT