Ankush Dhavre
गतवर्षी झालेल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाला जेतेपद मिळवून दिले होते.
त्यावेळी असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, पॅरिस सेंट जर्मन सोबत त्याचा करार संपेल त्यावेळी मोठ मोठे संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी ऑफर देतील.
पीएसजी त्याच्यासोबत करार वाढवण्यास उत्सुक आहे. तसेच बार्सिलोनाने देखील त्याला पुन्हा संघात समाविष्ट करण्यात रस दाखवला आहे.
असं सर्व असताना सौदी अरेबियातील एका फुटबॉल क्लबने त्याला मोठी ऑफर दिली आहे.
सौदी अरेबियातील अल हिलाल क्लबने त्याला ३६०० कोटींची ऑफर दिली आहे.
ही आतापर्यंत कुठल्याही खेळाडूला मिळालेली सर्वात मोठी ऑफर आहे.
पीएसजी संघात कायलियन एमबाप्पे, नेमार जूनियर आणि कर्णधार सर्जिओ रेमोस हे खेळाडू असूनही हा संघ सलग दुसऱ्या वर्षी UEFA चॅम्पियन्स लीगमधून बाहेर पडला होता.
lionel messi आयपीएल स्पर्धेतील एकूण खेळाडूंना दिले जाणाऱ्या वेतनाच्या चारपट पेक्षा जास्त रक्कम मेस्सीला मानधन म्हणून दिली जाणार आहे.