mayank agarwal yandex
Sports

Mayank Agarwal: IPL लिलावात अन्सोल्ड राहिला, आता ७ सामन्यात कुटल्या ६१३ धावा

Mayank Agarwal Record In Vijay Hazare Trophy: भारतीय संघातील स्टार फलंदाज मयांक अगरवालला आयपीएल लिलावात कुठल्याही संघाने खरेदी केलं नव्हतं. आता विजय हजारे ट्रॉफीत त्याने धावांचा पाऊस पाडला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये पार पडला. या लिलावात नवख्या खेळाडूंनी चांगलाच भाव खाल्ला. मात्र अनुभवी मयांक अगरवालवर कुठल्याही संघाने बोली लावली नाही.

या लिलावात अन्सोल्ड राहिल्यानंतर आता मयांकने आपल्या बॅटने उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. तो सातत्याने चांगली कामगिरी करतोय. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याच्या आक्रमक फलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला आहे.

या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने सलग ४ शतकं झळकावली आहेत. यासह या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे.

मयांकला भारतीय संघात संधी मिळत नाहीये. तर दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेतील ५ सामन्यांमध्ये त्याने ५०० हून अधिक धावा केल्या आहेत.

यादरम्यान त्याने ४ शतकं झळकावली आहेत. रविवारी नागालँडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ११६ चेंडूंचा सामना करत ११९ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ४ षटकार आणि ९ चौकार खेचले होते.

विजय हजारे ट्रॉफीत मयांकची हवा

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मयांक अगरवालची बॅट चांगलीच तळपली आहे. २०२४-२५ हंगामातील ७ सामन्यांमध्ये त्याने ६१३ धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने १८ षटकार आणि ६६ चौकार खेचले आहेत.

असा रेकॉर्ड असूनही त्याला भारतीय वनडे संघात स्थान मिळत नाहीये. लिस्ट ए क्रिकेटमधील १२० सामन्यांमध्ये त्याने ५० च्या सरासरीने ५५७८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १९ शतक आणि ४४ अर्धशतक झळकावले आहेत.

आयपीएल स्पर्धेतही मयांकचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्याने आयपीएल २०१२ स्पर्धेत फलंदाजी करताना २२५ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर २०१९ ते २०२३ दरम्यान फलंदाजी करतानाही त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला होता. मात्र २०२४ मध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

त्याने आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं होतं. मात्र कुठल्याही संघाने त्याला आपल्या संघात घेण्यात रस दाखवला नाही. आता त्याची ही कामगिरी पाहून कुठला संघ त्याला आपल्या संघात घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhar Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

Ind vs Eng Test : इंग्लंडचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; मँचेस्टर कसोटीच्या २ दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा, जादुई खेळाडूची ८ वर्षांनी एन्ट्री

SCROLL FOR NEXT