Mumbai T20 League saam tv
Sports

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

Mumbai T20 League Final: वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई टी20 लीगच्या अंतिम सामन्यात सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखाली मराठा रॉयल्सने आर्क्स अंधेरीचा पराभव केला. या विजयासह मराठा रॉयल्सने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला.

Surabhi Jayashree Jagdish

वानखेडे स्टेडियमवर शनिवारी रंगलेल्या नुवामा प्रायव्हेट टी-२० मुंबई लीगच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सने पुन्हा एकदा आपली बादशाहत सिद्ध करत आर्क्स अंधेरीचा ८ रन्सने पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद आपल्या नावावर केलं. चिन्मय सुतारच्या संयमी आणि झुंजार अर्धशतकामुळे तसंच तुषार देशपांडेच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे रॉयल्सने हा विजय मिळवला.

फायनल सामन्यात आर्क्स अंधेरीने १५५ रन्सचा पाठलाग सुरू केला पण त्यांना २० ओव्हर्समध्ये ८ बाद १४६ रन्सपर्यंत मजल मारता आली. अंधेरीकडून दिव्यांश सक्सेनाने पुन्हा एकदा शानदार खेळी करत ४० चेंडूंमध्ये ५१ रन्स केले. या सिझनमध्ये तीन अर्धशतकं झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरला आणि त्याने ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली. त्याने अर्जुन तेंडुलकरसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३८ रन्स आणि प्रग्नेश कानपिल्लेवारसोबत चौथ्या विकेटसाठी २५ रन्सची पार्टनरशिप केली.

प्रग्नेशने २१ चेंडूंमध्ये २ चौकार आणि १ षटकारासह जलद २१ रन्स केले. पण पुढच्याच चेंडूवर तो आदित्य धुमाळच्या गोलंदाजीवर आऊट झाला. अंधेरी ५ बाद १०४ अशा स्थितीत असताना कर्णधार शिवम दुबेवर मोठी जबाबदारी होती, मात्र तो फक्त १५ रन्सवर तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर आऊट झाला. गौरव जठारने १७ चेंडूंमध्ये २३ रन्स करत काही काळ आशा जिवंत ठेवली, पण अखेरीस रॉयल्सच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत सामना आपल्या बाजूने फिरवला.

मराठा रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हर्समध्ये ५ बाद १५४ धावा केल्या. सुरुवातीला संघ अडचणीत आला होता, कारण अर्जुन तेंडुलकरने लवकर दोन विकेट घेत रॉयल्सला ३ ओव्हर्समध्ये २ बाद २९ अशा स्थितीत आणले. मात्र चिन्मय सुतार आणि कर्णधार सिद्धेश लाड यांनी ६५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत डाव सावरला. लाडने २५ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या (३ चौकार, १ षटकार), तर सुतारने ५२ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि संघाला स्थैर्य दिले. सुतार अखेर निवृत्त झाला.

अखेरच्या ओव्हर्समध्ये रॉयल्सला रनरेट वाढवता आली नाही. तुषार देशपांडे आणि रोहन राजे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दुसरीकडे अंधेरीच्या गोलंदाजांनीही अचूक मारा करत रॉयल्सला १५४/५ वर रोखलं.

स्पर्धेत वैयक्तिक कामगिरीतही अंधेरीचा दिव्यांश सक्सेना चमकला. त्याने २६१ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. तर मराठा रॉयल्सचा कर्णधार तुषार देशपांडे याने १२ विकेट घेत पर्पल कॅप आपल्या नावावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई ठाण्यासह 'या' ठिकाणी आज शाळांना सुट्टी, प्रशासनाचे आदेश

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा! मुंबई पुण्यासह कोकणात आज 'रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

Chia Seeds vs Saunf Water: चिया सीड्स की बडीशेपचे पाणी; वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट?

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांसह बड्या अधिकार्‍यांचे अधिकार बदलले

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT