neeraj chopra with manu bhaker mother twitter
क्रीडा

Neeraj Chopra Viral Video: मनू भाकरच्या आईने घेतली नीरज चोप्राची भेट! नेटकरी म्हणाले, 'लग्न फिक्स..' -VIDEO

Neeraj Chopra Manu Bhaker Mother Viral Video: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने मनू भारकच्या आईची भेट घेतली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी चर्चा करायला सुरुवात केली आहे.

Ankush Dhavre

Neeraj Chopra With Manu Bhaker Mother: मनू भाकरच्या आई सुमेधा भाकर आणि नीरज चोप्राचा (Neeraj chopra) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोघेही दिर्घकाळ चर्चा करताना दिसून येत आहेत. मात्र हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी तर्क वितर्क लावताना दिसून येत आहेत.

लग्नाची मागणी घातल्याची चर्चा?

मनू भाकर (Manu bhaker) आणि नीरज चोप्रा यांनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. मनू भाकरने वैयक्तिक आणि मिश्र प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली. तर नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात रौप्य पदकाला गवसणी घातली. या कामगिरीनंतर चहुबाजूंनी या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. एकीकडे कौतुकाचा वर्षाव तर दुसरीकडे नीरज चोप्रा आणि मनू भाकरच्या आईचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरुन चुकीचा अर्थ काढला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

मनू भाकरच्या आईने नीरज चोप्राची भेट घेतल्यानंतर अफवा पसरवायला सुरुवात केली आहे. काही युजर्सचं म्हणणं आहे की, मनू भाकरची आई मनूसाठी नीरजला लग्नाची मागणी घालत आहे. तर काहींचं म्हणणं आहे की, मनूची आई बोलणी करुन नातं जोडण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नीरज चोप्रा आणि मनू भाकर चर्चा करताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच,काही युजर्सने दोघांना एकमेकांवर क्रश आहे,असं म्हटलंय. मात्र असं काहीच नाहीये. या सर्व अफवा आहेत. ते दोघेही नॉर्मल गप्पा मारत आहेत.

नीरज चोप्रा आणि मनू भाकर हे दोघेही भारतातील यशस्वी खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांनी भारतासाठी बहुमूल्य योगदान दिलं आहे. मनू भाकर ही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी भारताकडून पहिलीच खेळाडू ठरली होती. मनूने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली होती. त्यानंतर सरबजोत सिंगसोबत मिळून तिने १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारातही कांस्यपदकाला गवसणी घातली होती. तर नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT