RCB playoff squad latest news saam tv
Sports

RCB playoff news: प्लेऑफपूर्वी RCB ला मोठा झटका; हा मॅनविनर खेळाडू पडला बाहेर

RCB playoff squad latest news: आयपीएल २०२६ प्लेऑफपूर्वी आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. जेकब बेथेल दुखापतीमुळे इंग्लंडला परतला असून क्वालिफायरपूर्वी संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. आरसीबी आता विजेतेपदासाठी कशी तयारी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

इंडियन प्रीमियर लीगचे गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यंदाच्या वर्षीही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. आरसीबीसाठी लीग टप्पा संपला असून टीमने १४ सामन्यांत नऊ विजय मिळवले आहेत. त्यामुळे १८ पॉईंट्ससह टीमने पहिलं स्थान पटकावलंय. आरसीबी आता प्लेऑफच्या क्वालिफायर १ मध्ये खेळणार असून या सामन्यापूर्वी आरसीबीला मोठा धक्का बसलाय. टीममधील मॅचविनर खेळाडू इंग्लंडला परतला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान जेकब बेथेलच्या डाव्या बोटाला दुखापत झाली. तपासणीनंतर, इंग्लंडविरुद्धच्या आगामी टेस्ट सिरीजपूर्वी पुढील गोष्टींसाठी जेकब इंग्लंडला परत जाणार आहे.

जेव्हा फिल सॉल्ट जखमी झाला होता तेव्हा जेकब बेथेल आरसीबीसाठी डावाची सुरुवात करत होता. जेव्हा सॉल्ट इंग्लंडला परतला तेव्हा बेथेलला संधी देण्यात आली. आयपीएल २०२६ च्या सात सामन्यांमध्ये बेथेलने १४०.५२ च्या स्ट्राइक रेटने १६३ रन्स केलेत. दुखापतीमुळे बेथेल आरसीबीचा शेवटचा लीगमधील सामना खेळू शकला नव्हता.

आयपीएल २०२६ चे प्लेऑफ सामने २६ मे रोजी सुरू होणार आहे. पहिला क्वालिफायर सामना २६ मे रोजी धर्मशालामध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर २७ मे रोजी न्यू चंदीगडमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर २९ मे रोजी न्यू चंदीगडमध्ये दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. अंतिम सामना ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

  • क्वालिफायर १ - २६ मे - धर्मशाला

  • एलिमिनेटर - २७ मे - न्यू चंदीगड

  • क्वालिफायर २ - २९ मे - न्यू चंदीगड

  • अंतिम सामना - ३१ मे - अहमदाबाद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: चाळीशीतही २० वर्षांच्या मुलीसारखा गुलाबी ग्लो पाहिजे? मग फेसवॉश नव्हे, वापरा 'ही' घरगुती सामग्री

काळाचा घाला! रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडले; ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: वसईच्या मधुबन टाऊनशिपमधील ठाकूर स्कूलमध्ये अडकलेल्या ४१ शिक्षकांची सुखरूप सुटका

Kidney Health: तुमच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी; वेळीच घ्या स्वतःची काळजी

Maharashtra Weather Update: पुण्यासह राज्यभरात धो-धो कोसळणार पाऊस, पुढील ३ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT