suryakumar yadav twitter
क्रीडा

IND vs BAN मालिकेसह या खेळाडूची कारकीर्दही संपली! आधीच केली होती निवृत्तीची घोषणा

Ankush Dhavre

Mahmudullah Retirement From T20I Cricket: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत भारतीय संघाने २-० ने विजयी आघाडी घेतली होती. आता मालिकेतील तिसरा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत बांगलादेशवर १३३ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर स्टार खेळाडूने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे.

या स्टार खेळाडूचा टी -२० क्रिकेटला रामराम

भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी -२० मालिका सुरू होण्यापूर्वीच बांगलादेशचा अनुभवी खेळाडू महमदुल्लाहने निवृत्तीची घोषणा केली होती. ही मालिका त्याच्या टी -२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटची मालिका ठरली.

त्याने निवृत्ती जाहीर करताना सांगितलं होतं की, टी -२० क्रिकेटला रामराम करून वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची ही योग्य वेळ आहे. आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धा पाहता त्याने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

कसोटीनंतर टी -२० क्रिकेटला रामराम

महमदुल्लाह हा बांगलादेशचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याने २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटला रामराम केला होता. आता त्याने टी -२० क्रिकेटमधूनही निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तो वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे.

येत्या फेब्रुवारी - मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत तो बांगलादेश संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक असेल. टी -२० क्रिकेटमध्ये बऱ्याच वर्षांचा अनुभव असणाऱ्या महमदुल्लाहने २००७ मध्ये टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत १४१ टी -२० सामन्यांमध्ये २४४४ धावा केल्या आहेत. यासह गोलंदाजी करताना त्याने ४३ गडी बाद केले आहेत.

महमदुल्लाह हा टी -२० क्रिकेटमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने १७ वर्ष ४१ दिवस बांगलादेश संघाचं प्रतिनिधित्व केलं. तर अव्वल स्थानी बांगलादेशचा स्टार खेळाडू शाकिब अल हसन आणि दुसऱ्या स्थानी केन विलियम्सन आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP : राष्ट्रवादीचे निवडणूक रणनीतीकारांनी बाबा सिद्धिकींना वाहिली श्रद्धांजली

IND W vs AUS W: हरमनप्रीत एकटी लढली! सामना निसटला, मात्र अजूनही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी; पाहा समीकरण

Dombivli Politics: डोंबिवलीत ठाकरे गट - भाजपमध्ये जुंपली, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Funeral: बाबा सिद्दिकींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, VIDEO

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये जरांगे-भुजबळ समर्थक आमनेसामने

SCROLL FOR NEXT