Mahendra Singh Dhoni 43 th birthday  x
Sports

MS Dhoni Birthday Video: महेंद्रसिंग धोनीचा 43 वा वाढदिवस; वाढदिवसाच्या पार्टीला 'भाईजान' सलमान खानची हजेरी

Mahendra Singh Dhoni 43 th Birthday: कॅप्टन कूल एमएस धोनीचा आज वाढदिवस आहे. धोनीने स्वत:हून एक नाही तर तीन केक कापून सेलिब्रेशन केलं. धोनी 43 वा वाढदिवस साजरा करत असून एमएस धोनीच्या बर्थ डे पार्टीत अभिनेता सलमान खानने हजेरी लावलीय.

Bharat Jadhav

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अनंत अंबानींच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली. त्यानंतर एमएस धोनीने स्वतःचा वाढदिवस साजरा केला. 7 जुलै 1981 रोजी जन्मलेल्या धोनीने आपला 43 वा वाढदिवस मुंबईत साजरा केला. यावेळी धोनीने चक्क तीन केक कापले. धोनीच्या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने हजेरी लावली.

धोनीने केक कापल्यानंतर धोनीने सलमान खानला स्वतःच्या हाताने केक खाऊ घातला. बर्थडे सेलिब्रेशनदरम्यान पत्नी साक्षीनेही धोनीच्या पायाला स्पर्श आशीर्वाद घेतला. धोनीच्या बर्थडे पार्टीत सलमान खानने ब्लॅक शर्ट आणि जीन्स घातली होती. तर बर्थडे बॉय धोनीने टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली होती. कॅप्टन कूलने आपला वाढदिवस मुंबईत साजरा केला. बर्थडे सेलिब्रेशन करताना धोनीने एक नव्हे तर तीन केक कापले, ज्यामध्ये एका केकवर 7 हा आकडाही लिहिलेला होता.

या 3 पैकी एक केक सलमान खानचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोनीने आधी ७ क्रमांक असलेला केक कापला. केक कापल्यानंतर त्याने तो सर्वप्रथम पत्नी साक्षीला खाऊ घातला. यानंतर धोनीने सलमान खानलाही स्वत:च्या हाताने बर्थडे केक खाऊ घातला. धोनीने केक खाऊ घातल्यानंतर पत्नी साक्षीने त्याच्या पायाला दोन्ही हातांनी स्पर्श करून आशीर्वाद घेतला. साक्षीला हे करताना पाहून पार्टी हॉलमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना टाळ्या आणि आवाज करत तिचं अभिनंदन केलं.

साक्षीने धोनीच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केल्यावर धोनीने लगेच हात वर करून तिला आशीर्वाद दिला. धोनीचा वाढदिवस हा केवळ त्याच्यासाठी सेलिब्रेशनचा प्रसंग नसून त्याच्या चाहत्यांसाठी तो एक सण आहे. हा एक सण ते दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा करतात. मग ते रांचीचे लोक असोत किंवा चेन्नईतील माहीचे चाहते असोत. संपूर्ण भारतात हा खास दिवस वेगवेगळ्याप्रकारे साजरा केला करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडा ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT