Action On Wreslter Shivraj Rakshe  saam Tv
Sports

Maharashtra Kesari 2025: पंचांसोबत राडा करणं पडलं महागात; शिवराज राक्षेसह महेंद्र गायकवाडचं 3 वर्षांसाठी निलंबन

Action On Wreslter Shivraj Rakshe: महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात पैलवान शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केली होती. आता त्याच्यावर कारवाई करण्यात आलीय.

Bharat Jadhav

सुशील थोरात , साम प्रतिनिधी

महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत राडा घालणाऱ्या पैलवानांवर कारवाई करण्यात आलीय. उपांत्य फेरीत पंचांना लाथ मारणाऱ्या शिवराज राक्षेला आणि अंतिम फेरीच्या सामना अर्ध्यात सोडून जाणाऱ्या महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धामध्ये पंचांबरोबर गैरवर्तन केल्याने पैलवान महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांना पुस्तके परिषदेने तीन वर्षासाठी निलंबन केले आहे, अशी माहिती राज्य कुस्तीकर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिलीय. महाराष्ट्र केसरीचा उपांत्य फेरीचा सामना सुरू असताना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांचा कुस्तीचा सामना सुरू असताना एका मिनिटात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षेला चितपट केले होते.

मात्र हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नसल्याने त्याने पंच दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालून त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडला होता. या घटनेच्या निषेधार्थ आता सर्व पंचांनी एकत्र येत संपूर्ण सामने संपल्यानंतर बैठक घेतली असून या बैठकीत शिवराज राक्षे यावर गुन्हा दाखल करावा का नाही याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोडवे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फडणवीसांचा शिंदे-दादांना झटका,नगरविकास'च्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप?

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती सर्व गमवाली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

मराठी हिंदी वादात राज्यपालांची उडी,भाषिक वाद राज्यासाठी अहितकारी

Ganesh Chaturthi: कोकणातील चाकरमान्यांसाठी खूशखबर, गणेशोत्सवाला ट्रेनमधून कार नेता येणार

SCROLL FOR NEXT