Rohit Sharma revealed reason for the defeat saam tv
Sports

Rohit Sharma: खूप चुका केल्या, मी कर्णधार आणि फलंदाज म्हणून...; व्हाईटवॉशनंतर रोहित शर्माने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण!

India vs New Zealand Rohit Sharma: न्यूझीलंडने टीम इंडियाला पहिल्यांदाच भारतात व्हाईट वॉश दिला आहे. सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना का करावा लागला, हे रोहितने स्पष्ट केलंय.

Surabhi Jayashree Jagdish

न्यूझीलंडने टीम इंडियाला पहिल्यांदाच भारतात व्हाईट वॉश दिला आहे. वानखेडेवर झालेल्या पराभवानंतर न्यूझीलंडने ही टेस्ट सिरीज ३-० ने जिंकली. दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या पराभवानंतर रोहित शर्मा देखील नाराज झाल्याचं दिसून आलं.

तिसऱ्या टेस्ट सामन्यात भारतीय फलंदाजांना न्यूझीलंडच्या स्पिन गोलंदाजांचा सामना करता आला नाही. इतकंच नाही तर कर्णधार रोहित शर्मा या संपूर्ण सिरीजमध्ये फ्लॉप ठरला. या पराभवानंतर आता रोहित शर्माचं मोठं वक्तव्य समोर आलंय. सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना का करावा लागला, हे रोहितने स्पष्ट केलंय.

रोहितने सांगितलं पराभवाचं कारण

पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला की, तुम्हाला सिरीज गमावण्याचं दुःख माहितीये. टेस्ट हरणे सोपं नसतं. ही अशी गोष्ट आहे जी सहज तुम्ही पचवू शकत नाही. आम्ही आमचं सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही, आम्हाला ते माहितीये आहे आणि आम्हाला ते स्वीकारावे लागणार आहे. न्यूझीलंडने आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली. आमच्याकडून खूप चुका झाल्या आणि त्या मान्य कराव्याच लागतील.

आम्ही बंगळुरू आणि पुण्यात चांगले रन्स केले नाहीत आणि आम्ही खेळात खूप मागे होतो. या सामन्यात आम्हाला काही रन्सची आघाडी मिळाली. आम्हाला वाटलं की, आम्ही पुढे आहोत. लक्ष्य देखील साध्य करण्यासारखं आहे. आम्हाला फक्त थोडे प्रयत्न करायचे होते जे आम्ही करण्यात अपयशी ठरलो, असंही रोहित म्हणाला.

स्वतःच्या कामगिरीवरही रोहित नाराज

कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला की, जेव्हा मी फलंदाजीला जातो तेव्हा माझ्या मनात काही खास विचार आणि काही योजना असतात. मात्र या सिरीजमध्ये असं घडलं नाही आणि माझ्यासाठी हे निराशाजनक होतं. पंत, जयस्वाल आणि गिल यांनी या मैदानावर फलंदाजी कशी करायची हे शिकवलं.

पराभवाचं कारण रोहितने सांगितलं

रोहित पुढे म्हणाला की, वैयक्तिकरित्या, मी माझी सर्वोत्तम फलंदाजी आणि कर्णधार म्हणून देखील मी चांगली कामगिरी केली नाही. आम्ही एकत्रितपणे चांगली कामगिरी केली नाही आणि हेच या पराभवाचं कारण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

Maharashtra Politics: पंढरपुरमध्ये CM फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर

क्रिकेट खेळताना भयंकर घडलं, पोटाला बॅट लागली अन् जागीच कोसळला, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Crime News: ५ कोटींची रोख रक्कम, दीड किलो सोनं, आलिशान कार अन्... पोलिस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

Akshay Kumar: डीपफेक व्हिडीओ प्रकरणात अक्षय कुमारला दिलासा; हायकोर्टाने दिले महत्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT