LSG VS PBKS  Saam TV
Sports

IPL 2023: LSG चा स्टार गोलंदाज IPL 2023 स्पर्धेतून बाहेर! रिप्लेसमेंट म्हणून धाकड गोलंदाजाची एंट्री

Lucknow Super Giants IPL 2023: आजच्या सामन्यापूर्वीच लखनऊ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

LSG VS PBKS IPL 2023 Updates: आज आयपीएल २०२३ स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळणारआहे . पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने येणार आहेत.

तर दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दरम्यान दुसऱ्या सामन्यापूर्वीच लखनऊ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणारा सामना हा लखनऊच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज मयांक यादव (Mayank Yadav) हा दुखापतीमुळे आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या ऐवजी अर्पित गुलेरियाला संघात स्थान देण्यात आले आहे.

अर्पित गुलेरियाने (Arpit Guleria) हिमाचल संघासाठी पदार्पण केले होते. मात्र आता तो सर्व्हिसेस संघाचे प्रतिनिधित्व करतोय.

आयपीएल २०२३ स्पर्धेत अशी राहिलीये लखनऊ सुपर जायंट्स संघाची कामगिरी..

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा लखनऊ सुपर जायंट्स हा संघ या हंगामात जोरदार कामगिरी करतोय. या संघाने या हंगामात आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. यापैकी ३ सामन्यांमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाने विजय मिळवला आहे.

तर एका सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Latest sports updates)

आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी असा आहे लखनऊ सुपर जायंट्स संघ (Lucknow Super Giants Squad)

केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), काइल मेयर्स, दीपक हुडा, कुणाल पंड्या, अमित मिश्रा, निकोलस पूरन (यष्टीरक्षक ), नवीन-उल-हक, आयुष बडोनी, आवेश खान, करण शर्मा, युधवीर चरक, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, मार्क वुड, स्वप्नील सिंग, मनन वोहरा, डॅनियल सॅम्स, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौतम, जयदेव उनाडकट, मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, अर्पित गुलेरिया.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नव्या विहिरीसाठी सरकार देतंय ४ लाखांचं अनुदान, दुरुस्तीसाठी मिळतंय अर्थसहाय्य, कुठे कराल अर्ज?

Maharashtra News Live Update: बॅलेट पेपरवर निवडणूका व्हाव्यात ही मागणी - राज ठाकरे

Virtual Metro Smart Card : स्मार्टफोनच बनणार तुमचं मेट्रो कार्ड, खिशात कार्ड नसतानाही करा क्यूआर कोडद्वारे प्रवास; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Badlapur Video : बदलापूर स्कायवॉकवर जोडप्याचा 39 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल, महिलेला कोण मारहाण करतंय?

BJP Setback : भाजपची डोकेदुखी वाढली! माजी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, थेट पक्षावर काढला राग

SCROLL FOR NEXT