उमरान मलिकने सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना पदार्पण केलं होतं. त्याने आपल्या गतीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तो जेव्हा जेव्हा गोलंदाजीला यायचा त्यावेळी ताशी १५० च्या गतीने गोलंदाजी करायचा.
मात्र आता त्याला भारतीय संघात संधी मिळत नाहीये. आयपीएल स्पर्धेतही त्याला संघाबाहेर बसावं लागत आहे. आता आणखी एका युवा गोलंदाजीने आपल्या भन्नाट गतीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. हा गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून लखनऊचा युवा गोलंदाज मयांक यादव आहे.
लखनऊ सुपरजायंट्स संघाकडून खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज मयांक यादवला पंजाब किंग्जविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. या सामन्यातील १० व्या षटकात त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा घेत त्याने पहिलाच चेंडू ताशी १४७ च्या गतीने टाकला. याच षटकात त्याने १५० चा पल्ला देखील गाठला.
पुढील षटकात तर त्याने कहरच केला. पहिलाच चेंडू ताशी १५५.८ च्या गतीने फेकला. हा चेंडू फलंदाजी करत असलेल्या शिखर धवनला दिसलाच नाही. या चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तसेच हा आयपीएल २०२४ स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे.
या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबला चांगली सुरुवात मिळाली होती. सुरुवातीच्या १० षटकात पंजाबने बिनबाद १०० धावा केल्या होत्या. त्यानंतर ११ वे षटक टाकण्यासाठी मयांक यादव गोलंदाजीला आला आणि इथूनच सामना फिरायला सुरुवात झाली. मयांकने जॉनी बेअरस्टोला बाद करत माघारी धाडले. याच षटकात त्याने प्रभसिमरन सिंगला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर जितेश शर्माही बाद होऊन माघारी परतला. त्याने आपल्या स्पेलमध्ये २७ धावा खर्च करत ३ गडी बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.