ipl trophy saam tv news
क्रीडा

RR vs LSG: कोण होईल आऊट कोणाची होईल एंट्री? जाणून घ्या, राजस्थान आणि लखनऊची प्लेईंग ११ अन् पिच रिपोर्ट

RR vs LSG IPL 2024: आज लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. या सामन्यासाठी कोणते खळाडू मैदानात उतरतील आणि पिच कसं आहे याची माहिती घेऊ.

Bharat Jadhav

LSG vs RR Playing XI & Pich Report:

आज सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. पण या सामन्यासाठी दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन कसे असतील? लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल खेळणार का? तसेच खेळपट्टीचा अहवाल आणि सामना कसा होईल याचा एक अंदाज आपण घेणार आहोत.(Latest News)

सवाई मानसिंह स्टेडियम फलंदाजांसाठी चांगलं असल्याचं मानलं जातं. या स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे आहे. फलंदाज सहज धावा करतात. गेल्या हंगामातही सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्ससमोर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले होतं. या पिचवर सलग २०० हून अधिक धावांचे टार्गेट बनवण्यात संघांना यश आले आहे. या स्टेडियमवर संघांना आव्हानांचा पाठलाग करायला आवडते.

आतापर्यंत झालेल्या ५२ आयपीएल सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी ३४ वेळा विजय मिळवला आहे. यामुळे जो संघ नाणेफेक जिंकेल तो संघ प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेईल, असा अंदाज आहे. दरम्यान आतापर्यंत लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स आयपीएलमध्ये तीनदा आमनेसामने आलेत. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने २ वेळा विजय मिळवला आहे. तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने १ विजय नोंदवलाय. यावरून लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स वरचढ असल्याचं आकडेवारीवरून दिसून येते.

लखनऊ सुपर जायंट्स अशी उतरेल मैदानात

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल या सामन्यात खेळेल असं सांगितलं जात आहे. या संघाचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि देवदत्त पडिक्कल असू शकतात. तर मधल्या फळीत दीपक हुडा, केएल राहुल, निकोलस पुरन आणि आयुष बडोनीसारखे फलंदाज असतील. मार्कस स्टॉइनिस आणि कृणाल पंड्या हे अष्टपैलू म्हणून मैदानात उतरतील. तर गोलंदाजीची जबाबदारी नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांच्यावर असेल.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेइंग ११

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, दीपक हुडा, केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि रवी बिश्नोई.

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करेल

राजस्थान रॉयल्सला यशाच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी संजू सॅमसनच्या खांद्यावर असेल. जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल हे सलामीवीर असू शकतात. तर मधल्या फळीत संजू सॅमसन, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि ध्रुव जुरेलसारखे फलंदाज मैदानात उतरतील. या संघात रवी अश्विन, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट यांच्यावरही संघला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागेल.

राजस्थान रॉयल्सची प्लेइंग ११-

जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, ध्रुव जुरेल, आर अश्विन, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

SCROLL FOR NEXT