लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत आणि युवा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठी सिंह या दोघांनाही आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधार ऋषभ पंतला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला तर गोलंदाज दिग्वेश राठीला त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
दिग्वेशला आयपीएल लिलावात ३० लाख रूपयांच्या बेस प्राइजवर लखनऊ सुपर जायंट्सने संघात सामील केले होते. लखनऊकडून गोलंदाजी करताना दिग्वेशने फलंदाज नमन धीरला बाद केल्यानंतर नोटबुक सेलिब्रेशन केले होते. या कृतीची पुनरावृत्ती झाल्यामुळे बीसीसीआय त्याच्या मॅच फी मधून ५० टक्के रक्कम कापणार आहे.
कर्णधार ऋषभ पंतला बीसीसीआयचा दणका
शुक्रवारी एकाना स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला दंड ठोठावण्यात आला आहे. कोणत्याही गोलंदाजी संघाला २० ओव्हर पूर्ण करण्यासाठी ९० मिनिटे निश्चित केलेली वेळ असते. लखनऊ संघ निर्धारित वेळेपेक्षा एक ओव्हर मागे होता. यामुळे त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये ३० यार्ड बाहेर एक फिल्डर कमी ठेवावा लागला. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत हा दंड ठोठावण्यात आला. 'आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत, संघाचा हंगामातील स्लो ओव्हर-रेटशी संबंधित पहिलाच गुन्हा असल्याने, ऋषभ पंतला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे' असे बीसीसीआयने प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे.
दिग्वेश राठीला सेलिब्रेशन करण पडलं महागात
आयपीएलच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल लखनऊचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीला सलग दुसऱ्यांदा त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याआधीही, पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी दिग्वेशला त्याच्या मॅच फीचा अर्धा भाग द्यावा लागला होता. पंजाबविरुद्धच्या सामन्यात प्रियांस आर्यला बाद करताना त्याने अशाच पद्धतीने सेलिब्रेशन केले होते.
मुंबईविरुद्ध, दिग्वेशने चार ओव्हरमध्ये २१ धावा देऊन नमन धीरचा विकेट घेतला. मुंबईचा फलंदाज नमन धीरला बाद केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा नोटबुक लिहिण्याच्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन केले. दिग्वेशचा, या हंगामातला कलम २.५ च्या अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा होता. त्यामुळे त्याला दोन डिमेरिट पॉईंट मिळाले. याआधी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात नोटबुक सेलिब्रेशन केल्याबद्दल १ डिमेरिट पॉईंट त्याच्या खात्यात जोडण्यात आला होता. या सेलिब्रेशमुळे त्याची सर्वच स्तरावरुन टीका झाली. लखनऊ लुपर जायंट्सने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव करत आयपीएलमध्ये आपला दुसरा विजय नोंदवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.