ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईच्या डोंबिवली उपनगरात,अजिंक्य रहाणेचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ज्यांनी त्याच्या क्रिकेटच्या आवडीला पूर्ण पाठिंबा दिला. अजिंक्यने वयाच्या १७ व्या वर्षी प्रवीण अमरे यांच्याकडे सराव करण्यास सुरुवात केली.
अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपवरकर हे लहाणपणीचे मित्र आहेत. त्यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
अजिंक्य आणि राधिकाच्या कुटुंबियांना त्यांच्या नात्याबद्दल कळाल्यानंतर त्यांनी मधयस्थी केली. त्यामुळे एका सुंदर प्रेमकथेची सुरुवात झाली.
अजिंक्यच्या क्रिकेट प्रवासात राधिकाचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. राधिका अजिंक्यची सर्वात मोठी चीअर लीडर आहे. ती प्रत्येक सामन्यांमध्ये त्याच्यासोबत असते.
२६ सप्टेंबर २०१४ रोजी अजिंक्य आणि राधिका लग्नबंधनात अडकले. हा विवाह महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडला.
राधिका आणि अजिंक्य दोन गोंडस मुलांचे आई बाबा आहेत. आर्या आणि राघवच्या आगमनाने त्यांचे प्रेम आणखी फुलले.
अजिंक्यचे इन्स्टाग्रामवर ५.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. अजिंक्य आणि राधिका या दोघांचाही साधेपणा त्यांच्या चाहत्यांना भावतो.