Lucknow Bowler Notebook Celebration saam tv
Sports

Lsg Vs Pbks: विकेट घेतल्यानंतर लखनऊच्या गोलंदाजाचं 'नोटबुक' सेलिब्रेशन, अंपायरने दिली वॉर्निंग; BCCI कारवाई करण्याची शक्यता

दिग्वेशने प्रियांशला बाद केल्यानंतर एका अनोख्या शैलीत आनंद साजरा केला. मात्र, दिग्वेशच्या या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मंगळवारी आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात पंजाब किंग्जचा ८ विकेट्सने विजय झाला. दरम्यान या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा स्पिनर गोलंदाज दिग्वेश राठी आणि पंजाब किंग्जचा ओपनर प्रियांश आर्या यांच्यात एक घटना घडली. या सामन्यामध्ये दिग्वेशने प्रियांशची विकेट घेतल्यानंतर एका वेगळ्या पद्धतीने सेलेब्रेशन केलं. दरम्यान दिग्वेशच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करण्यात येतेय.

दिग्वेशने केली कमाल

आयपीएल २०२५ मध्ये मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात प्रियांश आर्यला दिग्वेश राठीने आऊट केलं. प्रियांशची विकेट गेल्यानंतर त्याने नोटबुक स्टाईलध्ये सेलिब्रेशन केलं. हे पाहून सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना सेलिब्रेशनची ही पद्धत आवडली नाही. ते म्हणाले की, प्रत्येक चौकारावर फलंदाजही असं करत नाहीत.

सुनील गावस्कर संतापले

सुनील गावस्कर यांनी दिग्वेश राठी याच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली. गावस्कर म्हणाले की, असं सेलिब्रेशन करणं योग्य नाही. विकेट मिळाल्यावर गोलंदाजाने शांत राहिलं पाहिजे. जेव्हा फलंदाज चौकार मारतो, तेव्हा तो देखील असं काहीही करत नाही. या प्रकरणी दिग्वेशला बीसीसीआयकडून दंडही होऊ शकतो. अशा खेळाडूंना यापूर्वी आयपीएलमध्ये दंड ठोठावण्यात आला आहे.

चाहत्यांना आली विराटची आठवण

दिग्वेशच्या सेलिब्रेशनने चाहत्यांना विराट कोहलीची आठवण करून झाली. 8 वर्षांपूर्वी 2017 मध्ये वेस्ट इंडिजच्या केसरिक विल्यम्सने विराट कोहलीला बाद केल्यानंतर अशाच पद्धतीचं सेलिब्रेशन केलं होतं. यानंतर विराटने 2019 मध्ये एका टी-20 सामन्यात या गोलंदाजाला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावेळी विराटनेही विल्यम्सला नोटबुक सेलिब्रेशन करून दाखवलं होतं.

पंजाबसमोर लखनऊ फेल

या सामन्यात लखनऊच्या टीमने पहिल्यांदा फलंदाजी करत पंजाबसमोर १७२ रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. लखनऊच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. तर पंजाब किग्सने १६ ओव्हर्समध्ये केवळ २ विकेट्स गमावून हा सामना जिंकला. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने ३४ चेंडूत ६९ रन्सची खेळी केली. तर कर्णधार श्रेयस अय्यरने ३० चेंडूत नाबाद ५२ रन्स केले. याशिवाय नेहल वढेरानेही ४३ रन्सचं योगदान दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT