LSG vs RCB Virat, Duplessis and Maxwell hit half-centuries saam tv
Sports

LSG vs RCB: विराट, डुप्लेसी आणि मॅक्सवेलची अर्धशतकी खेळी, आरसीबीने उभारला 212 धावांचा डोंगर

IPL 2023 : आरसीबीने जबरदस्त खेळी खरत लखनऊला 212 धावांचे लक्ष्य दिले आहे. आरसीबीकडून विराट कोहली, फाप ड्यूप्लेसी आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी जबरदस्त अर्धशतकी खेळी केली.

Chandrakant Jagtap

Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : IPL 2023 च्या 15 व्या सामन्यात सोमवारी, बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून लखनऊने बंगळुरूला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. यानंतर आरसीबीने जबरदस्त खेळी खरत लखनऊला 212 धावांचे लक्ष्य दिले आहे. आरसीबीकडून विराट कोहली, फाप ड्यूप्लेसी आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी जबरदस्त अर्धशतकी खेळी केली.

सुरुवातीला फलंदाजी करताना आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डुप्लेसीस यांनी जबरदस्त खेळी करत अर्थशतकं ठोकली. परंतु विराट कोहली अमित मिश्राच्या चेंडूवर विराट कोहली 44 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. त्यानंतर मैदानावर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक खेळी करत आरसीबीचा स्कोरअरबोर्ड धावता ठेवला. मॅक्सवेल 29 चेंडूत 59 धावा करून बाद झाला. त्याने 6 षटकार आणि तीन चौकार लगावले.

एका बाजून डुप्लेसीसने खिंड लढवत संघाचा स्कोअर 200 च्या पार पोहोचवला. डुप्लेसीस शेवटपर्यंत नॉटआऊट राहिला. त्याने 46 चेंडूत 79 धावांची मोठी खेळी खेळली. आरसीबीच्या सुरुवातीच्या तीन फलंदाजांनी मिळूनच लखनऊसमोर 212 धावांच आव्हान ठेवलं आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ

लोकेश राहुल (कर्णधार), काइल मायर्स, दीपक हुडा, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, निकोलस पूरन, नवीन-उल-हक, आयुष बडोनी, आवेश खान, करण शर्मा, युधवीर चरक, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, मार्क वुड, स्वप्नील सिंग, मनन वोहरा, डॅनियल सायम्स, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौतम, जयदेव उनाडकट, मार्कस स्टोइनिस, रवी बिश्नोई आणि मयंक यादव.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संपूर्ण संघ

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, वेन पारनेल, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव आणि मायकेल ब्रेसवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

SCROLL FOR NEXT