लखनऊ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुलला आयपीएल स्पर्धेत एक मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४८ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा संघ मुंबई इंडियन्स संघाला आव्हान देण्यासाठी मैदानात उतणार आहे. हा सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात अवघ्या ३५ धावा करताच त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे.
या सामन्यात केएल राहुलला इतिहास रचण्याची संधी असणार आहे. तो मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान मिळवू शकतो. त्याने या स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध आतापर्यंत १६ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ८६७ धावा केल्या आहेत. त्याला मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये शिखर धवनला मागे सोडण्यासाठी केवळ ३५ धावांची गरज आहे. शिखर धवनच्या नावे ९०१ धावा करण्याची नोंद आहे. त्याला मागे सोडण्यासाठी केएल राहुलला अवघ्या ३५ धावांची गरज आहे. तर विराट कोहली ८५५ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्ध असा राहिलाय रेकॉर्ड..
केएल राहुलच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १६ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ३ शतकं झळकावली आहेत. त्याच्या नावे मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर त्याचा मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलेल्या गेल्या दोन्ही सामन्यातील रेकॉर्ड पाहिला, तर त्याने १६ एप्रिल रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ६० चेंडूंचा सामना करत १०३ धावांची खेळी केली होती.
तर २४ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या सामन्यात त्याने ६२ चेंडूत १०३ धावा चोपल्या होत्या. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने शतकी खेळी केली आहे. त्यामुळे लखनऊच्या फॅन्सला आज होणाऱ्या सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..
मुंबई इंडियन्स..
रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, हार्दिक पंड्या( कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयुष चावला, ल्युक वूड, जसप्रीत बुमराह
लखनऊ सुपरजायंट्स ..
क्विंटन डी कॉक, केएल राहुल(यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टोइनिस, दीपक हुड्डा, निकोलस पुरन, क्रुणाल पंड्या, मणिमारन सिद्धार्थ, मॅट हेनरी, रवि बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकुर.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.