LSG Vs MI IPL 2025 Highlights x
Sports

LSG Vs MI : नमन आणि सूर्यानं सावरलं; पण कर्णधाराकडूनच चाहत्यांची निराशा, लखनऊचा मुंबईवर सहज विजय

LSG Vs MI IPL 2025 Highlights : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना एकाना स्टेडियममध्ये खेळला गेला. घरच्या स्टेडियममध्ये रंगलेल्या लढतीमध्ये लखनऊने मुंबईला पराभवाचे पाणी पाजले.

Yash Shirke

LSG Vs MI IPL 2025 Highlights : लखनऊ विरुद्ध मुंबईच्या लढतीमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा विजय झाला आहे. यामुळे लखनऊच्या संघाने आयपीएल २०२५ मधील दुसरा विजय नोंदवला आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत कोण जिंकेल असा थरार पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये आवेश खानने लखनऊचा विजय निश्चित केला.

एकाना स्टेडियममध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खेळला गेला. सामन्याच्या सुरुवातीला मुंबईच्या कर्णधाराने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, लखनऊ संघाचे शिलेदार फलंदाजीसाठी आले. २० ओव्हर्समध्ये लखनऊने एकूण २०३ धावा केल्या.

सलामीला आलेल्या एडम माक्ररम आणि मिचेल मार्श यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकीय खेळी केली. सुरुवातीला लखनऊची सामन्यावर पकड होती. पण ती हळूहळू सुटली. तरीही मधल्या क्रमात आयुष बडोनी आणि डेव्हिड मिलर यांनी खेळ सावरला. कर्णधार रिषभ पंत २ धावा करुन बाद झाला. दुसऱ्या बाजूला मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या चमकला. त्याने या सामन्यामध्ये ५ विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या इनिंगमध्ये विल जॅक्स आणि रेयान रिकल्टन हे मुंबई इंडियन्सचे सलामीवर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. पण दोघेही स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नमन धीरने खेळ पुढे नेला. नमन धीर ४६ धावा करुन बाद झाला. सूर्याने ६७ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्याने सामना जिंकवून देण्यासाठी शेवटपर्यंत झुंज दिली. पण त्याची झुंज अपयशी ठरली. मुंबईने २० ओव्हर्समध्ये १९१ धावा केल्या.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

विल जॅक्स, रेयान रिकल्टन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ड, अश्वनी कुमार, दीपक चहर, विग्नेश पुथुर.

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेईंग ११ -

एडन माक्ररम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकुर, दिग्वेश राठी, आकाश दीप, आवेश खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT