Lovlina Borgohain Twitter
Sports

Lovlina Borgohain चा जर्मनीच्या बॅाक्सरला हरवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

यंग बाॅक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने (Lovlina Borgohain) विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

वृत्तसंस्था

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) मंगळवारचा दिवस भारतीय बॉक्सरसाठी (Indian Boxer) चांगला दिवस ठरला. यंग बाॅक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने (Lovlina Borgohain) विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने राऊंड-16 मध्ये जर्मनीची अनुभवी बॅाक्सर नदिन एपेत्जला पराभूत केले आहे. लोव्हलिना 64-69 किलो वजन गटातील महिलांचे प्रतिनिधित्व करीत आहे.

तिने सुरुवातीपासूनच जर्मन खेळाडूवर लगातार आक्रमण केले. ती अनुभवी नाडिनविरुद्ध कधीही दबावात खेळली नाही. लोव्हलिना बोरगोहेनला पाच प्रशिक्षकांनी अनुक्रमे 28, 29, 30, 30 आणि 27 गुण दिले. त्याच वेळी, जर्मन खेळाडूला अनुक्रमे 29, 28, 27, 27 आणि 30 गुण मिळाले.

आता 30 जुलैला होणाऱ्या क्वार्टर फायनलमध्ये लोव्हलिनाचा सामना चिनी तैपेईच्या नेन चीन चेनशी होणार आहे. आशियाई क्वालिफायर्समध्ये उझबेकिस्तानच्या मफुनाखोन मिलेवाला पराभूत करून तिने या ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. लोव्हलिना बोरगोहेनने जागतिक स्पर्धेत आणि आशियाई चँपियनशिपमध्ये प्रत्येकी दोनदा कांस्यपदक जिंकले आहे.

यापूर्वी सोमवारी बॉक्सर आशिष कुमारचा प्रवास पहिल्या फेरीत संपला. पुरुषांच्या 69-75 किलोग्राम गटात चीनच्या एर्बिक तोहेताने त्याला 5-0 ने पराभूत केले. आशिषला पाच प्रशिक्षकांनी 28-28 गुण दिले. त्याच वेळी, प्रत्येकाने तोहेताला 29-29 गुण दिले. आशिषचा पराभव हा टोकियो ऑलिम्पिकमधील भारताच्या तिसऱ्या पुरुष बॉक्सरचा पराभव आहे. त्याच्या अगोदर विकास कृष्ण आणि मनीष कौशिकसुद्धा पहिल्या फेरीत पराभवानंतर बाहेर पडले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT