Viral video from Delhi Test shows couple’s funny fight in stadium Saam TV Marathi News
Sports

IND vs WI Live सामन्यात प्रेमाचा राडा, तरूणीनं तरूणाच्या कानाखाली जाळ काढला, नेमकं झालं काय? पाहा व्हिडिओ

Viral video from Delhi Test shows couple’s funny fight in stadium : दिल्ली कसोटीत लाईव्ह सामन्यात अनोखा प्रसंग घडला. एका तरुणीने आपल्या पार्टनरच्या कानाखाली मस्करीत मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा प्रसंग भारत-वेस्ट इंडिज सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये घडला.

Namdeo Kumbhar

Girl slaps boyfriend during India vs West Indies Test match : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी दिल्लीमधील मैदानात सुरू आहे. चौथ्या दिवशी भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहचलाय. पण सोमवारी स्टेडियममध्ये तरूण अन् तरूणीमध्ये जे झालं, त्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. लाईव्ह सामन्यात तरूण-तरूणीला प्रपोज करताना आपण अनेकदा पाहिलेय, पण दिल्ली कसोटीच्या चौथ्या दिवशी याच्यापेक्षा वेगळेच झाले.

लाईव्ह सामन्यात एक तरूणी आपल्या पार्टनरला मारताना दिसत आहे. त्या मुलीने त्या मुलाच्या दोन-तीन कानाखाली लगावल्या. गळा पकडून काहीतरी सांगत होती. ही हाणामारीची गंभीर घटना नव्हती. मस्करी सुरू असल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तरूणाने काहीतरी सांगितलं, त्यामुळे तरूणीने मिश्किलपणे, लाडात त्याच्या कानाखाली लगवाली अन् काहीतरी सांगत होती. मुलगाही हसत हसत तिला बोलत होता.

स्टेडियममध्ये आहे, हे विसरलेच -

वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजी करताना होता, त्यावेळी हा सर्व प्रसंग घडला. वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात चार विकेटच्या मोबदल्यात २३४ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडे २३ धावांची ही आघाडी होती. त्यावेळी कॅमेराममनने अचानक तरूण-तरूणीकडे कॅमेऱ्याचा फोकस केला. त्यावेळी तरूणी जोडीदाराला मारत असल्याचे दिसले. पण पुढच्याच क्षणाला हे काही सिरियस नसल्याचे समजले. कारण तरूण तिला हसत हसत प्रतिसाद देत होता अन् काहीतरी सांगत होता. आपल्याकडे कॅमेरा असल्याचे त्या दोघांनाही माहितीच नव्हते.

भारताला १२१ धावांचे आव्हान -

वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात ३९० धावा करत भारतासमोर १२१ धावांचे लक्ष्य ठेवले. सोमवारी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एका विकेटच्या मोबदल्यात ६३ धावा केल्या आहेत. अहमदाबादमध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि १४० धावांनी जिंकला होता. भारताने दुसऱ्या कसोटीत पहिला डाव पाच विकेटच्या मोबदल्यात ५१८ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ केवळ २४८ धावा करू शकला आणि त्यांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात विंडिजने झुंज दिली. पाचव्या दिवशी भारत विजयावर शिक्कामोर्तब करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loni Dosa: नाश्त्याला बनवा मऊ, जाळीदार लोणी डोसा; मिनिटांत डिश होईल फस्त

Bachhu Kadu: EVM चे रोप कोणी आणलं? आता भाजपने ते वटवृक्ष बनवलं- बच्चू कडू |VIDEO

Maharashtra Live News Update: चोपड्यात पोलिसांची मोठी कारवाई, आठ किलो गांजा जप्त

Konkan Politics: अखेर वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये प्रवेश, तीनवेळा हुकला होता मुर्हूत

Silver Pooja Items Cleaning: दिवाळीपूर्वी घरीच स्वच्छ करा चांदीची भांडी, फक्त १० रूपयांच्या वस्तूने येईल चमक

SCROLL FOR NEXT