lok sabha 2024 master blaster sachin tendulkar cast vote in mumbai amd2000 twitter
क्रीडा

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क! मतदानाचं महत्व पटवून देत म्हणाला...

Sachin Tendulkar, Lok Sabha 2024: भारताचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने देखील मतदान केलं असून इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

Ankush Dhavre

देशभरात लोकशाहीचा उस्तव सुरु आहे. आज (२० मे) देशभरात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी नागरिकांनी सकाळी ७ वाजल्यापासून प्रचंड गर्दी केली आहे. दरम्यान भारताचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने देखील मतदान केलं असून इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

सचिन तेंडुलकरने सहकुटुंब मतदान करण्यासाठी हजेरी लावली आहे. सचिनसह अर्जुन तेंडुलकरने देखील मतदान करण्यासाठी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. तेंडुलकर कुटुंबाने पाली हिल मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

मतदान केल्यानंतर सचिनने माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्याने मतदानाचं महत्व पटवून देत मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, ' मी निवडणूक आयोगाचा आयकॉन आहे. मतदानाते महत्व पटवून देण्यासाठी आणि मतदानाबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी मी अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. दोन कारणांमुळे समस्या उद्भवतात. पहिलं म्हणजे जेव्हा तुम्ही विचार नर करता कार्य करता आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही काहीच न करता केवळ विचार करता. मी सर्वांना आवाहन करतो की, सर्वांनी मतदान करा. हे आपल्या देशासाठी अतिशय महत्वाचं आहे.'

अजिंक्य रहाणेनेही केलं मतदान

भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेनेही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. नुकताच आयपीएल खेळून घरी परतलेल्या अजिंक्य रहाणेने आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT