गतविजेता इंग्लंडचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करताना दिसून आला आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडचा संघ अवघ्या १५६ धावांवर ऑल आउट झाला.
इंग्लंडच्या या सुमार कामगिरीसह संघातील खेळाडू आदिल राशिद एका विशेष कारणामुळे चर्चेत आला आहे. या सामन्यात तो आगळ्या वेगळ्या पद्धतीने धावबाद झाला आहे. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
तर झाले असे की, इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना श्रीलंकेकडून महिश थिक्षणा ३२ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्याने षटकातील पाचवा चेंडू वाईड चेंडू टाकला होता. या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या डेव्हिड विलीने बॅट फिरवली.
तर नॉन स्ट्राईकला असलेला आदिल राशिद क्रिझ सोडून पुढे आला होता. हे पाहताच श्रीलंकेचा कर्णधार आणि यष्टिरक्षक कुसल मेंडिसने चेंडू पकडला आणि थेट नॉन स्ट्राईकच्या दिशेने फेकला. स्टंपला जेव्हा चेंडू लागला यावेळी आदिल राशिद क्रिझच्या बाहेर होता. (Latest sports updates)
अंपायरने त्याला धावबाद घोषित केलं. धाव घेण्याची कुठलीही संधी नसताना आदिल राशिद इतक्या पुढे येऊन उभा होता. ज्यावेळी कुशल मेंडिसने थ्रो मारला, त्यावेळी देखील त्याला मागे जाण्याची संधी होती. मात्र तो काही लवकर मागे गेला नाही.
आदिल राशिद ७ चेंडूंमध्ये २ धावा करत माघारी परतला. त्यावेळी समालोचन करत असलेल्या दिनेश कार्तिकने, झोपा काढत होता की काय... असं म्हटलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करत असलेल्या इंग्लंडचा डाव अवघ्या १५६ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने ३० आणि डेव्हिड मलानने २८ धावांची खेळी केली.
या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून पथुन निसंकाने नाबाद ७७ धावांची खेळी केली. तर समरविक्रमाने ६५ धावांचे योगदान दिले. यासह श्रीलंकेने हा सामना ८ गडी राखून जिंकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.