ks bharat  twitter
Sports

KS Bharat Catch Video: एकच नंबर भावा! भरतच्या त्या कॅचने करून दिली थालाची आठवण पाहा VIDEO

Ks Bharat Catch: केएस भरतने एक भन्नाट झेल टिपला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ओव्हलच्या मैदानावर रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. अवघ्या ७६ धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज माघारी परतले होते.

डेव्हिड वॉर्नर स्वरूपात ऑस्ट्रेलिया संघाला दुसरा मोठा धक्का बसला. त्याला शार्दूल ठाकूरने बाद करत माघारी धाडले. दरम्यान त्याला बाद करण्यासाठी केएस भरतने एक भन्नाट झेल टिपला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी सुरु असताना २२ वे षटक टाकण्यासाठी शार्दूल ठाकूर गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला.

हा चेंडू यष्टिरक्षण करत असलेल्या केएस भरतपासून लांब होता. मात्र केएस भरतने डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला. हा झेल टिपल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

उस्मान ख्वाजा स्वस्तात माघारी परतल्यानंतर डेव्हीड वॉर्नरवर डाव सावरण्याची जबाबदारी होती. ही जबाबदारी त्याने योग्यरीत्या पार पाडली. त्याने ४३ धावांची खेळी केली. तो मोठी खेळी करण्याच्या वाटेवर असताना शार्दूल ठाकूरने त्याची विकेट घेत भारतीय संघाला सामन्यात कमबॅक करून दिलं. (Latest sports updates)

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११ :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव,शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी,

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, नॅथन लियॉन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: जवळच्या व्यक्तीकडून होणार फायदा, ५ राशींना पैशाची तंगी; वाचा शनिवारचे राशी

Maharashtra Live News Update: गॅस टंचाईच्या मुद्द्यावर ठाकरेसेनेचे नाशिकमध्ये आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा चालवणारी 'हिरकणी' आई; ३ वर्षांच्या मुलीसोबत कष्टमय झुंज

Pak vs Ban : रन आऊटवरून 'रणकंदन'! पाकिस्तान-बांगलादेशी खेळाडूंमध्ये मैदानातच राडा, सलमान आगा भडकला, ग्लोव्ह्ज आपटले, हेल्मेट फेकला

चिकन आणि मटणाची दुकाने ३ दिवस बंद राहणार, प्रशासनाकडून आदेश जारी

SCROLL FOR NEXT