ks bharat  twitter
Sports

KS Bharat Century: केएस भरतचं शतक प्रभू श्री रामांना समर्पित! प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी केलं हटके सेलिब्रेशन; Video

KS Bharat Celebration Video: भारतीय अ संघ आणि इंग्लंड लायन्स यांच्यादरम्यान सुरु असलेल्या सामन्यात शतक पूर्ण करताच केएस भरतने हटके सेलिब्रेशन केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

KS Bharat Celebration After Century:

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय अ संघ आणि इंग्लंड लायन्स या दोन्ही संघामध्ये ३ सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका सुरू आहे.

या मालिकेतील पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज केएस भरतने खणखणीत शतक ठोकलं आहे. दरम्यान या शतकी खेळीनंतर हटके सेलिब्रेशन केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मालिकेतील पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात झळकावलेलं हे शतक केएस भरतने प्रभू श्री राम यांना समर्पित केलं आहे. आज (२२ जानेवारी) अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यापूर्वी केएस भरतने हे सेलिब्रेशन करून कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. हे शतक झळकावल्यानंतर त्याने प्रभू श्री राम यांना प्रणाम करत धनुष्य हाती घेऊन बाण मारत असल्याची पोझ दिली आहे. (Cricket news in marathi)

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात ३ यष्टिरक्षक फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान या शतकी खेळीनंतर त्याने संघात स्थान मिळवण्याचा दावा केला आहे. इंग्लंडविरुद्ध होणारी कसोटी मालिका ही भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचं असेल तर ही मालिका मोठ्या फरकाने जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे.

भारतीय अ संघाला हा सामना जिंकण्यासाठी ४९० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने शेवटच्या दिवशी १२५ षटक अखेर ५ गडी बाद ४२६ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर अंपयारने सामना समाप्तीची घोषणा केली. त्यामुळे भारतीय संघ विजयापासून केवळ ६४ धावा दूर राहिला. भरतने १६५ चेंडूत १५ चौकार मारत ११६ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT