Virat Kohali Saam Tv
क्रीडा

World Cup: कोहलीच आहे किंग; एकाच वर्ल्डकपमध्ये ठोकली सर्वाधिक अर्धशतकं, सचिन तेंडुलकरला सोडलं मागे

Bharat Jadhav

Most Fifties Scored In World Cup Tournament:

वनडे वर्ल्ड २०२३ चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये रंगला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या सामन्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी बुधवारी (15 नोव्हेंबर) जमले. भारताने प्रथम फलंदाजी करताना अप्रतिम सुरुवात मिळवली. यादरम्यानच विराट कोहली वनडे क्रिकेटच्या इतिहासात तिसरा सर्वात यशस्वी फलंदाज बनला. त्याचबरोबर त्याने सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रम केलाय. (Latest News)

वर्ल्ड कप २०२३ चा पहिला सेमिफायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंडच्या क्रिकेट संघात होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. भारताचा सेमिफायनलचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केलीय. भारतीय संघाच्या फलंदाजांनी सर्व प्रेक्षकांना तितकाच मोठा आनंद दिला. रोहितच्या आक्रमक फटकेबाजीनंतर विराट कोहलीनं आपल्या शानदार खेळीने प्रेक्षकांची मने जिकंली.

एकाच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रम कोहलीने आपल्या नावावर केलाय. एकाच वर्ल्ड कपमध्ये जास्त अर्धशतकं फक्त तीन फलंदाज करू शकले आहेत. भारताने प्रथम फलंदाजी करताना अप्रतिम सुरुवात केली. रोहित शर्माने नेहमीप्रमाणे आक्रमक खेळी करत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दबाव टाकला. रोहितने शर्माने षटकार मारण्याचा बाबतीत वर्ल्डकप स्पर्धेत मोठा विक्रम केला.

तर विराट कोहली वनडे क्रिकेटच्या इतिहासात तिसरा सर्वात यशस्वी फलंदाज बनलाय. तर एकाच वर्ल्ड कपमध्ये तो सर्वाधिक अर्धशतक करणारा पहिला फलंदाज बनलाय. यातही त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडलं आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकाच वर्ल्डकपमध्ये ७ अर्धशतकं केली आहेत.

एकाच महासंग्रामात सर्वाधिक अर्धशतकं करणाऱ्यांच्या यादीत फक्त तीन खेळाडूंची नावे आहेत. यात शाकिब अल हसनने ७ अर्धशतकं केली होती. त्यानंतर सचिन तेंडुलकरने ७ अर्धशतकं केली आहेत. आता या दोघांना मागे टाकत ८ अर्धशतकं केली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT