RCB vs CSK, IPL 2024, Playoff Scenario at Bangalore match SAAM TV
Sports

RCB Playoff Scenario : RCB प्लेऑफमध्ये कसा पोहोचणार? शक्यता काय आणि किती? समीकरण समजून घ्या!

RCB vs CSK, IPL 2024, Playoff : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्ज हे दोन बलाढ्य संघ भिडणार आहेत. एम चिन्नास्वामी मैदानात होणाऱ्या या सामन्यात 'चौथा कोण? हे निश्चित होईल.

Nandkumar Joshi

आयपीएल २०२४ चं प्लेऑफचं समीकरण एखाद्या लढतीसारखंच रोमहर्षक झालंय. तीन संघ निश्चित झाले आहेत. आता चौथ्या स्थानासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात लढत होणार आहे. समीकरण फारच गुंतागुंतीचं झालंय. बेंगळुरू संघाला कशी आणि किती संधी असेल, हे समजून घेऊयात.

कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या तीन संघांनी आधीच प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलंय. आता एकच जागा आहे. त्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्ज हे दोन बलाढ्य संघ भिडणार आहेत. एम चिन्नास्वामी मैदानात होणाऱ्या या सामन्यात 'चौथा कोण? हे निश्चित होईल. बेंगळुरूला कोणत्याही परिस्थितीत विजय हवा. फक्त जिंकणं महत्वाचं नाही, तर 'नशिबानं'ही साथ द्यायला हवी.

आयपीएल स्पर्धेत बेंगळुरूनं मागील पाचही सामने जिंकले आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या प्रवेशाबाबतच्या आशा अजूनही जिवंत आहेत. पण त्यांच्यासाठी प्लेऑफमध्ये पोहोचणे म्हणजे अडथळ्यांची शर्यत आहे. कारण हे समीकरण खूपच गुंतागुंतीचं झालंय. अनेक खडतर आव्हानं पार करावी लागणार आहेत.

या सामन्यावेळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसं झालं तर बेंगळुरूची वाट बिकट होणार आहे. चेन्नईविरुद्ध मोठ्या विजयाची आवश्यकता आहे. पाऊस झाला तर, षटके कमी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं ही वाट अधिक निसरडी होण्याची शक्यता आहे. सामना किती षटकांचा खेळवला जाईल त्यावर आरसीबीला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी किती आहे हे ठरेल.

२० षटकांचा सामना झाला तर, आरसीबीला प्रथम फलंदाजी करताना किमान २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा कराव्या लागतील.

त्यानंतर चेन्नईला किमान १८ किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी पराभूत करावे लागेल.

जर सामन्यावेळी पाऊस आला आणि षटकं कमी केली तर, पुन्हा समीकरण बदलेल. जर सामना पाच षटकांचा झाला आणि बेंगळुरूनं प्रथम फलंदाजी करताना ८० धावा केल्या तर चेन्नईला ६२ धावांपर्यंतच रोखावं लागणार आहे.

चेन्नई पराभूत होऊनही प्लेऑफमध्ये पोहोचणार

प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी बेंगळुरूला कोणत्याही परिस्थितीत चांगल्या रनरेटसह चेन्नईला पराभूत करावं लागेल. तसं झालं नाही तर, चेन्नई पराभूत होऊनही प्लेऑफमध्ये जाऊ शकतो. फक्त बेंगळुरूपेक्षा चेन्नईचा नेट रनरेट चांगला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT