KL Rahul Saam Tv
Sports

IND VS AUS 2nd Test:'न्यूटन'चा नियम मोडत केएल राहुलने पकडला अफलातून कॅच ; व्हिडीओ होतोय व्हायरल

या सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुलने टिपलेला झेल सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

Saam TV News

IND VS AUS 2nd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत सुरु आहे.

दरम्यान या सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुलने टिपलेला झेल सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

एकीकडे ऑस्ट्रेलिया संघाचे विकेट्स जात असताना, उस्मान ख्वाजा भारतीय संघातील गोलंदाजांना तोडीस तोड उत्तर देत होता. त्याने ख्वाजाने जोरदार फलंदाजी करत १२५ चेंडूंमध्ये ८१ धावांची खेळी केली.

असे वाटले होते की, तो या डावात शतकी खेळी करणार. मात्र ४६ व्या षटकात तो रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला.(Latest Sports Updates)

तर झाले असे की, उस्मान ख्वाजा फलंदाजी करत असताना ४६ वे षटक टाकण्यासाठी रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर उस्मान ख्वाजाने चौकार मारला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. कारण पॉईंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या केएल राहुलने न्यूटनचा नियम मोडत उजव्या बाजूला डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

ज्यावेळी केएल राहुलने हा झेल टिपला त्यावेळी उस्मान ख्वाजाला विश्वासच बसत नव्हता. केएल राहुलने या डावात ३ झेल टिपले आहेत. त्यापैकी हा सर्वोत्तम झेल आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११ :

केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, केएस भरत, अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT