KL Rahul 
क्रीडा

IPL 2024, LSG vs PBKS: राहुलच्या फ्लॉप शोवर भडकले चाहते, सोशल मीडियावर घेतली क्लास

KL Rahul : केएल राहुल त्याच्या फ्लॉप फलंदाजीमुळे पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आलाय. शनिवारी पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात केएल राहुल ९ चेंडूत केवळ १५ धावा करून बाद झाला. यादरम्यान केएल राहुलने एक षटकार आणि एक चौकार मारला.

Bharat Jadhav

Fans Troll KL Rahul On Social Media :

दरम्यान त्याच्या या खेळीवर चाहते नाराज झालेत.शनिवारी झालेल्या सामन्यात निकोलस पूरन लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार म्हणून मैदानात उतरवलं होतं. तर केएल राहुल इम्पॅक्ट खेळाडू म्हणून सामना खेळत होता. राहुल दुखापतीनंतर सावरत असल्याने लखनऊ सुपर जायंट्स संघ त्याच्यावर जास्त जबाबदारी देण्यास तयार नाहीये. परंतु राहुलने या सामन्यात चांगली कामगिरी केली नसल्याने त्याच्यावर टीका केली जात आहे. (Latest News)

सोशल मीडियावर चाहते त्याच्यावर टीका करत आहेत. पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने केएल राहुलला बाद केलं. अर्शदीप सिंगने केएल राहुलला जॉनी बेअरस्टोकडे झेल दत बाद केले. केएल राहुल केवळ १५ धावा केल्या.

केएल राहुल आऊट होताच सोशल मीडियावर चाहते सक्रिय झाले आणि राहुलला ट्रोल करू लागले. एका यूजरने कमेंट करताना त्याने लिहिले की, 'केएल राहुल विश्वसनीय फलंदाज नाही.' गेल्या वर्षी देखील केएल राहुल दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलच्या स्पर्धेतून बाहेर राहिला होता.

आयपीएल २०२४ मध्येही केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नाहीये. लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) ने पंजाब किंग्ज (पीबीकेएस) चा २१ धावांनी पराभव केला. लखनऊ प्रथम फलंदाजी करताना ८ गड्यांच्या मोबदल्यात १९९ धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२ कागदपत्रेही आहेत ग्राह्य

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT