KL Rahul In World Cup 2023 SAAM TV
Sports

KL Rahul News : केएल राहुलला BCCI चे मोठे गिफ्ट, वर्ल्डकप सुरू असतानाच दिली मोठी जबाबदारी

KL Rahul In World Cup 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केएल राहुलला वर्ल्डकप स्पर्धा सुरू असतानाच मोठी जबाबदारी दिली आहे.

Nandkumar Joshi

KL Rahul In World Cup 2023 :

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) केएल राहुलला वर्ल्डकप स्पर्धा सुरू असतानाच मोठी जबाबदारी दिली आहे. टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी त्याची नेमणूक केली आहे. हार्दिक पंड्या दुखापतीमुळं वर्ल्डकप खेळू शकणार नाही. त्याच्या जागी केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवलं आहे.

हार्दिक पंड्या वर्ल्डकपमधून बाहेर झाल्याच्या वृत्तावर आयसीसीने शनिवारी सकाळी शिक्कामोर्तब केले. वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने हार्दिक पंड्याला उपकर्णधारपदी नियुक्त केले होते. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पंड्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतरचे सामने तो खेळू शकला नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता पंड्या वर्ल्डकप स्पर्धेतूनच बाहेर झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने केएल राहुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

टीम इंडियाचा विजयरथ सुरूच

वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. सलग सात सामन्यांत विजय मिळवून १४ अंकांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने सेमिफायनलमध्ये धडक दिली आहे.

टीम इंडियाचा आठवा सामना उद्या रविवारी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कोलकाता येथील इडन गार्डन्स मैदानात होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून अव्वल स्थान कायम राखण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. रन मशीन विराट कोहलीचा उद्या वाढदिवस आहे. या ऐतिहासिक मैदानात विजय मिळवून रोहित सेना विराटला खास बर्थडे गिफ्ट देईल, अशीच अपेक्षा भारतीय चाहत्यांची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

Thackeray vs Shinde: शिंदे 'नरकासूर'; नरक चतुर्दशीवरून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी शरद पवार गटात नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT