KKR vs SRH, IPL Qualifier 1 kolkata knight riders playing XI Prediction phil salt replacement amd2000 twitter
Sports

KKR Playing XI: फिल सॉल्टच्या जागी विस्फोटक फलंदाजाची एन्ट्री! SRH विरुद्ध अशी असेल KKR ची प्लेइंग ११

KKR vs SRH, Playing XI Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल कोलकाता नाईट रायडर्सची प्लेइंग ११ ? जाणून घ्या.

या खेळाडूला मिळणार प्लेइंग ११ मध्ये स्थान

कोलकाता नाईट रायडर्स हा आयपीएल २०२४ स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने आतापर्यंत ९ सामने जिंकत प्लेऑफमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी चिंता वाढवणारी बाब म्हणजे प्लेऑफच्या सामन्यांमध्ये आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज फिल सॉल्ट नसणार आहे. त्याच्याऐवजी रहमानुल्लाह गुरबाजला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. या सामन्यात तो सुनील नरेनसोबत डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो.

या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाजी क्रम मजबूत असल्याचे पाहायला मिळाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर नितिश राणा आणि चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तर पाचव्या क्रमांकावर वेंकटेश अय्यर, सहाव्या क्रमांकावर आंद्रे रसल,रिंकू सिंग आणि रमनदीप सिंग फलंदाजी करण्यासाठी येईल. गोलंदाज म्हणून मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती यांना प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेइंग ११ (KKR vs SRH Playing XI Prediction)

रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमनदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि मिचेल स्टार्क.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT