KKR vs SRH IPL 2024 Final sunil narine saam tv
Sports

KKR vs SRH: अवघ्या १८ धावा करताच सुनील नरेन रचणार इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरणार पहिलाच खेळाडू

Sunil Narine Record In IPL 2024 Final: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान होणाऱ्या सामन्यात सुनील नरेनला एक मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेचा फायनलचा थरार कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा तर सनरायझर्स हैदराबाद संघाला दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघातील सलामीवीर फलंदाज सुनील नरेनला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेत सुनील नरेन हा कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी सुपरहिट ठरला आहे. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडली आहे. दरम्यान अंतिम सामन्यात त्याच्याकडे इतिहास रचण्याची संधी आहे. त्याला आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकाच हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा आणि १५ गडी बाद करणारा गोलंदाज बनण्याची नामी संधी आहे. हा रेकॉर्ड करण्यासाठी त्याला केवळ १८ धावांची गरज आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये १७९.८५ च्या स्ट्राइक रेटने ४८२ धावा केल्या आहेत. त्याला ५०० धावांचा पल्ला गाठण्यासाठी केवळ १८ धावांची गरज आहे.

यासह त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी आणखी एक मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. ५०० धावा करताच तो गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा आणि आंद्रे रसलनंतर कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी एकाच हंगामात ५०० धावा करणारा चौथा खेळाडू ठरणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर या संघाने साखळी फेरीत ९ सामने जिंकले. तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि २ सामने पावसामुळे रद्द झाले. क्वालिफायर १ च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत या संघाने स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: १५०० आले, २१०० येणार, आता वडापाव घ्या; ट्रेनमध्ये लाडक्या भावाची मार्केटिंग; VIDEO

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये अतीवृष्टीचा बळी

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! डान्स अन् अभिनयाची आवड जोपासत केली UPSC क्रॅक; IPS श्रृती अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT